Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुना मोंढा ते नविन पूलदरम्यान अतिक्रमणांवर कारवाई

नांदेड : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नांदेड-वाघाळा महानगरपालिका आणि पोलीस विभागाने संयुक्त अतिक्रमण विरोधी मोहीम राबवत जुना मोंढा टॉवर ते

‘लोकमंथन न्यूज २४’च्या बातमीचा मोठा इफेक्ट! बालमटाकळीतील आमरण उपोषणाची दोन दिवसांतच दखल
नांदेड शहरात रस्त्यावरच कायद्याची धज्जी! ट्रॅफिक पोलिसाची दादागिरी, तरुणाला उघड धमक्या; व्हिडिओ व्हायरल होताच संताप उसळला
समन्वयाच्या अभावामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण; जेसीबी चालकावर हल्ल्यानंतर प्रशासनावर टीकेची झोड

नांदेड : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नांदेड-वाघाळा महानगरपालिका आणि पोलीस विभागाने संयुक्त अतिक्रमण विरोधी मोहीम राबवत जुना मोंढा टॉवर ते नविन पूल परिसरातील अतिक्रमणे हटवली.
या कारवाईत रस्त्याच्या दुतर्फा उभारलेले हातगाडे, फ्लेक्स, लोखंडी शेड व वाढीव बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली. सुमारे 25 ते 30 अतिक्रमणधारकांवर कारवाई करत 4 ट्रक माल जप्त करण्यात आला. तसेच एका अतिक्रमणधारकास 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. जुना मोंढा हा गजबजलेला व्यापारी भाग असल्याने अतिक्रमणामुळे वाहतुकीस व रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होत होता. वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. ही मोहीम पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अजितपालसिंघ संधू यांच्या नेतृत्वात पार पडली. यात महापालिकेचे सुमारे 30 व पोलीस विभागाचे 20 कर्मचारी सहभागी होते. महानगरपालिकेने नागरिक व व्यापार्‍यांना रस्त्यावर अतिक्रमण न करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन केल्यास पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

COMMENTS