Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. शिंदे यांचा सत्कार

भाळवणी : मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. सुरेश शिंदे यांचा पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कलेच्या माध्यमातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणाऱ्या डॉ. शिंदे यांच्या कार्याची यावेळी दखल घेण्यात आली. माळकुपसारख्या खेडेगावातून शिक्षण घेत नगर येथे स्थायिक झालेल्या आणि सध्या भाळवणी येथे वैद्यकीय व्यवसाय सांभाळणाऱ्या डॉ. शिंदे यांनी कलेच्या क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी मराठी चित्रपट आणि लघुपटांमध्ये केलेल्या अभिनयामुळे आतापर्यंत सुमारे पंधरा पुरस्कार मिळवले असून त्यांच्या दहा लघुपटांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही नाव कमावले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पत्रावळ’ या लघुपटात त्यांनी साकारलेल्या मुख्य भूमिकेसाठी त्यांना ‘संस्कृती कलादर्पण’चा लक्षवेधी लघुपट पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या अभिनयाची दखल विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतही घेण्यात आली आहे. डॉ. शिंदे यांचा ‘निळावंती’ हा मराठी चित्रपट जुलै महिन्यात महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार असून सध्या ते एका हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. यावेळी युवा नेते डॉ. प्रदीप दाते, पत्रकार संपत कपाळे, पत्रकार शिवशंकर शिंदे, संतोष तांबे आदी उपस्थित होते.

‘कृष्णप्रिया’ संस्थेचे बाल सुसंस्कार शिबीर उत्साहात
नगराध्यक्ष रोहिणी घुलेंच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
शिलाई मशिन योजनेच्या नावाखाली महिलांना गंडा  

भाळवणी : मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. सुरेश शिंदे यांचा पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कलेच्या माध्यमातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणाऱ्या डॉ. शिंदे यांच्या कार्याची यावेळी दखल घेण्यात आली.

माळकुपसारख्या खेडेगावातून शिक्षण घेत नगर येथे स्थायिक झालेल्या आणि सध्या भाळवणी येथे वैद्यकीय व्यवसाय सांभाळणाऱ्या डॉ. शिंदे यांनी कलेच्या क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी मराठी चित्रपट आणि लघुपटांमध्ये केलेल्या अभिनयामुळे आतापर्यंत सुमारे पंधरा पुरस्कार मिळवले असून त्यांच्या दहा लघुपटांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही नाव कमावले आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पत्रावळ’ या लघुपटात त्यांनी साकारलेल्या मुख्य भूमिकेसाठी त्यांना ‘संस्कृती कलादर्पण’चा लक्षवेधी लघुपट पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या अभिनयाची दखल विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतही घेण्यात आली आहे.

डॉ. शिंदे यांचा ‘निळावंती’ हा मराठी चित्रपट जुलै महिन्यात महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार असून सध्या ते एका हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. यावेळी युवा नेते डॉ. प्रदीप दाते, पत्रकार संपत कपाळे, पत्रकार शिवशंकर शिंदे, संतोष तांबे आदी उपस्थित होते.

COMMENTS