Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आष्टी बसस्थानक की डुकरांचे नंदनवन?8 वर्षांचा वनवास संपणार तरी कधी?

एकीकडे आष्टी तालुका प्रगतीच्या दिशेने झेपावत असताना, दुसरीकडे तालुक्याच्या प्रवेशद्वारासारख्या असलेल्या बसस्थानकाची दयनीय अवस्था ‘दिव्याखाली अंधा

अंबाजोगाईत एस.एफ.आयकडून जलकुंड स्वच्छता मोहीम राबवली
टाकळीत उडणार धुरळा! ‘रानोबा केसरी’ बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणारनागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – युवा नेते सुरज घुले
बीड जिल्ह्यातील कारखानदाराकडून ऊस उत्पादकावर संक्रात-दत्ता वाकसे



एकीकडे आष्टी तालुका प्रगतीच्या दिशेने झेपावत असताना, दुसरीकडे तालुक्याच्या प्रवेशद्वारासारख्या असलेल्या बसस्थानकाची दयनीय अवस्था ‘दिव्याखाली अंधार’ या म्हणीची जाणीव करून देते. 2018 साली नवीन इमारतीसाठी निविदा निघूनही तब्बल आठ वर्षांनंतरही प्रवाशांच्या नशिबी घाण, दुर्गंधी आणि गैरसोयींचाच ‘प्रवास’ कायम आहे. दरम्यान लोकप्रतिनिधी बदलले, सत्तांतर झाले;मात्र बसस्थानकाचे चित्र मात्र जैसे थेच राहिले आहे.
सध्या आष्टी बसस्थानकाची अवस्था एखाद्या कचरा डेपोला साजेशी झाली आहे. अर्धवट उभी असलेली नवीन इमारत प्रवाशांपेक्षा डुकरांच्या आश्रयस्थानातच रूपांतरित झाल्याचे चित्र दिसते. पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही, तर स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत भीषण आहे. परिणामी प्रवाशांना उघड्यावर लघुशंकेसाठी जावे लागत असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.  भूक किंवा तहान लागल्यावर नाश्ता-पाणी करायचे असेल तर बाहेर जावे लागते. नातेवाइकांना सोडण्यासाठी आलेल्या नागरिकांना आपले वाहन उभे करण्यासाठी जागेचेही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे किमती वाहन बेवारस ठेवावे लागत आहे. गरिबीची परी म्हणून ओळख असलेल्या बसस्थानकात कर्मचार्‍यांना व प्रवाशांना पिण्यासाठी बोअरचे पाणी बॅरल मध्ये भरून आहे.लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या बसस्थानकात शुध्द आणि थंड पाण्याचीही सोय करण्यात आलेली नाही.टाक्यांमध्ये जमा केलेले पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरावे लागणार आहे.अनेक प्रवासी बाहेरगावी जाण्यासाठी सकाळीच घरून निघतात. नाश्ता करण्याची इच्छा झाल्यास त्यांना बसस्थानकाच्या बाहेर जावे लागणार आहे. प्रवास करणार्‍या स्तनदा मातांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या स्थानकात हिरकणी कक्ष तयार करण्यात आले आहे. मात्र या खोलीलाही कुलूप असल्याने लहान बाळांना स्तनपान करताना सार्वजनिक ठिकाणी स्तनदा महिलाची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब येथील व्यवस्थापनाकडे अनेकदा मांडण्यात आली.मात्र त्यांच्याकडून आम्ही काय करणार ? हा आमचा विषय नाही हेच उत्तरे ऐकायला मिळतात 2018 मध्ये तत्कालीन आमदार भीमराव धोंडे यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली.त्यानंतर पाच वर्षे आमदार बाळासाहेब आजबे यांनी नेतृत्व केले, तर सध्या आमदार सुरेश धस यांच्याकडे जबाबदारी आहे. मात्र ‘काम कुणाच्या काळात सुरू झाले’ किंवा ‘तांत्रिक अडचणी काय होत्या’ याच्याशी सामान्य नागरिकांना काहीही देणेघेणे नाही. त्यांना अपेक्षा आहे ती फक्त स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज बसस्थानकाची. याठिकाणी राज्यभरातून येणारे प्रवासी येथे येऊन अत्यंत नकारात्मक अनुभव घेऊन परतत आहेत. 2024 पूर्वी या प्रकल्पाचा वेग अत्यंत संथ होता. अलीकडील काळात काही प्रमाणात हालचाल दिसून येत असली, तरी आठ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटल्याने नागरिकांचा संयम संपत चालला आहे.हे काम युद्धपातळीवर पूर्ण होणे अत्यावश्यक झाले आहे. आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे आमदार सुरेश धस यांनी या प्रश्नात थेट लक्ष घालून हस्तक्षेप करून रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे,अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे. नवीन बसस्थानकाला लाखो रुपये खर्च करून आष्टीच्या वैभवात भर घालणारे आधुनिक बसस्थानक लवकरात लवकर सुरू करावे राहावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. आष्टीसारख्या महत्त्वाच्या शहराचे बसस्थानक इतक्या खालच्या दर्जाचे असणे हे दुर्दैवी आहे. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी आता तरी गांभीर्याने लक्ष देऊन ही नर्कयातना थांबवावी.

COMMENTS