Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्याम मानव यांनी नांदेड जिल्ह्यात पाय ठेवून दाखवावा- दीपक सातोरे

नांदेड : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी देशाचे  निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना आंबेडकरी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. त्यांना ड

गायकवाडचे बोल म्हणजे सत्तेतून आलेला माज !
आ.संजय गायकवाडांवर खा.छत्रपती शाहू महाराजांचा संताप
पुस्तक, इतिहास आणि धमकी !

नांदेड : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी देशाचे  निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना आंबेडकरी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊ देणार नाही. असे वक्तव्य करून समाजामध्ये अराजकता  फैलावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आंबेडकरी समाजातील बरेच नेते मंदिर- मशीद व सर्व समाजातील धार्मिक स्थळांमध्ये जाऊन सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करत असतात. भूषण गवई यांना राजकीय वारसा असल्याने ते बागेश्वर बाबा यांच्या भेटीला गेले होते. श्याम मानव यांना प्रसिद्धीची हुकी उठल्याने ते काहीतरी बोलून समाजामध्ये अराजकता फैलावण्याचे काम करत आहेत. आपल्या देशातील कायद्याने प्रत्येक व्यक्तीला  अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून श्याम मानव यांना कुणाच्याही स्वातंत्र्यावर गद्दा आणण्याचा कोणताही अधिकार पोहोचत नाही.श्याम मानव  यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी नांदेड जिल्ह्यात पाय ठेवून दाखवावा असे आव्हान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) चे जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातोरे यांनी दिले आहे.

COMMENTS