Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतला रिंग रोड कधी होणार? वारंवार वाहतूक कोंडी; दूरदृष्टीचा अभाव; बायपास रखडल्याने विकासावर परिणाम 

कर्जत : शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि त्यानुसार न होणारे नियोजन यामुळे कर्जत शहरातील वाहतूक प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. रिंग रोड किंवा बायपाससारख्या दीर्घकालीन उपाययोजनांचा अभाव प्रकर्षाने जाणवत असून, नागरिकांकडून आता ठोस निर्णयाची मागणी जोर धरत आहे. राज्यातील अनेक शहरांनी वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रिंग रोड आणि बायपासचा पर्याय स्वीकारला आहे. अहिल्यानगर, करमाळा, श्रीगोंदा, बारामती यांसारख्या शहरांबरोबरच कर्जत तालुक्यातील मिरजगाव, माही-जळगाव या गावांनाही बायपासची सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र कर्जत शहर या बाबतीत मागे राहिल्याची भावना व्यक्त होत आहे.  सध्या कर्जत शहरातील मुख्य रस्ते म्हणजे वाहतुकीचा गोंधळ बनले आहेत. मोठ्या वाहनांची वर्दळ, रस्त्याच्या कडेला अनियंत्रित पार्किंग आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या नवीन नसून अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शहरातील मर्यादित बाजारपेठ, औद्योगिक विकासाचा अभाव आणि आसपासच्या गावांची वाढती आर्थिक स्पर्धा यामुळे कर्जतच्या विकासावर परिणाम होत आहे. त्यातच वाढती वाहतूक कोंडी ही आणखी एक मोठी अडचण ठरत आहे. फक्त रस्ते रुंदीकरण करून हा प्रश्न सुटणार नाही, हे स्पष्ट आहे. अतिक्रमण हटविणे हा तात्पुरता उपाय ठरतो. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता दीर्घकालीन नियोजनाची गरज अधोरेखित होत आहे. तज्ज्ञांच्या मते, रिंग रोड किंवा बायपास हाच या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यापूर्वी कर्जत शहराभोवती रिंग रोडचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र तो प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असून अनेक वर्षांपासून त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात कृती होणे गरजेचे आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल, तर रिंग रोडचे स्वप्न साकार होऊ शकते. आता नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे — कर्जतच्या भविष्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय नेमका कधी घेतला जाणार?  याकडेच आता लक्ष लागले आहे. दोन आमदार ; तरीही निघेना मार्ग  कर्जतच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व असतानाही हा प्रश्न न सुटणे अधिक चिंतेचा विषय ठरत आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे राज्यस्तरीय प्रभाव असूनही कर्जतसाठी रिंग रोड किंवा बायपासचा प्रश्न का मार्गी लागत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

हॉटेलवर छापा; चार पीडित महिलांची सुटका; जातेगाव शिवारात कारवाई; दोन आरोपी ताब्यात
भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी अनारसे
नालेगावमध्ये संत गोरोबा काका समाधी सोहळा उत्साहात   

कर्जत : शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि त्यानुसार न होणारे नियोजन यामुळे कर्जत शहरातील वाहतूक प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. रिंग रोड किंवा बायपाससारख्या दीर्घकालीन उपाययोजनांचा अभाव प्रकर्षाने जाणवत असून, नागरिकांकडून आता ठोस निर्णयाची मागणी जोर धरत आहे.

राज्यातील अनेक शहरांनी वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रिंग रोड आणि बायपासचा पर्याय स्वीकारला आहे. अहिल्यानगर, करमाळा, श्रीगोंदा, बारामती यांसारख्या शहरांबरोबरच कर्जत तालुक्यातील मिरजगाव, माही-जळगाव या गावांनाही बायपासची सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र कर्जत शहर या बाबतीत मागे राहिल्याची भावना व्यक्त होत आहे.

 सध्या कर्जत शहरातील मुख्य रस्ते म्हणजे वाहतुकीचा गोंधळ बनले आहेत. मोठ्या वाहनांची वर्दळ, रस्त्याच्या कडेला अनियंत्रित पार्किंग आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या नवीन नसून अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

शहरातील मर्यादित बाजारपेठ, औद्योगिक विकासाचा अभाव आणि आसपासच्या गावांची वाढती आर्थिक स्पर्धा यामुळे कर्जतच्या विकासावर परिणाम होत आहे. त्यातच वाढती वाहतूक कोंडी ही आणखी एक मोठी अडचण ठरत आहे.

फक्त रस्ते रुंदीकरण करून हा प्रश्न सुटणार नाही, हे स्पष्ट आहे. अतिक्रमण हटविणे हा तात्पुरता उपाय ठरतो. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता दीर्घकालीन नियोजनाची गरज अधोरेखित होत आहे. तज्ज्ञांच्या मते, रिंग रोड किंवा बायपास हाच या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यापूर्वी कर्जत शहराभोवती रिंग रोडचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र तो प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असून अनेक वर्षांपासून त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात कृती होणे गरजेचे आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल, तर रिंग रोडचे स्वप्न साकार होऊ शकते. आता नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे — कर्जतच्या भविष्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय नेमका कधी घेतला जाणार?  याकडेच आता लक्ष लागले आहे.

दोन आमदार ; तरीही निघेना मार्ग 

कर्जतच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व असतानाही हा प्रश्न न सुटणे अधिक चिंतेचा विषय ठरत आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे राज्यस्तरीय प्रभाव असूनही कर्जतसाठी रिंग रोड किंवा बायपासचा प्रश्न का मार्गी लागत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

COMMENTS