Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प थोडक्यात बचावले; अमेरिकेतील व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डेंट्स डिनरदरम्यान गोळीबार

वॉशिंग्टन : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डेंट्स डिनर कार्यक्रमादरम्यान अचानक गोळीबार झाल्य

आखातात युद्धाचा भडका! इराणकडून भारतीय खलाशी असलेल्या टँकरवर गोळीबार
औषधांवर 100 टक्के आयात शुल्क; अमेरिकेच्या निर्णयाने पेेटंट औषधांची निर्यात महागणार
अरबी समुद्रात अमेरिका आणि इराण पुन्हा समोरासमोर; अमेरिकन नौदलाने इराणचे जहाज गोळीबार करून जप्त
Donald Trump: व्हाईट हाऊसमध्ये गोळीबाराचा मोठ्यानं आवाज, सुरक्षा  कर्मचाऱ्यांनी तात्काळ डोनाल्ड ट्रम्प यांना घेरलं; हल्लेखोराला क्षणात लोळवलं  ...

वॉशिंग्टन : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डेंट्स डिनर कार्यक्रमादरम्यान अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. शहरातील हिल्टन हॉटेलमध्ये शनिवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स तसेच मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ सदस्य उपस्थित होते. मात्र, वेळीच खबरदारी घेतल्यामुळे राष्ट्राध्यक्षांसह सर्व मान्यवर सुरक्षित राहिले.
प्राथमिक माहितीनुसार, गोळीबाराचे आवाज डिनर हॉलच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीतून आले. आवाज होताच सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या आणि संपूर्ण परिसर ताब्यात घेतला. उपस्थित मान्यवरांना तत्काळ खाली झोपण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष आणि इतर मान्यवरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित व्यक्तीला अटक केली. मात्र, त्याचा हेतू काय होता आणि तो शस्त्रांसह इतक्या कडेकोट सुरक्षेत कार्यक्रमस्थळी कसा पोहोचला, याचा तपास सुरू आहे. सुरक्षेतील संभाव्य त्रुटींवरही प्रश्‍न उपस्थित होत आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच हॉटेलमधील सर्व पाहुण्यांना बाहेर काढण्यात आले. परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना हॉटेलपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असला, तरी तो सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. अन्य कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. घटनेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्षांनी सुरक्षा यंत्रणांचे कौतुक केले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे त्यांनी नमूद केले. उपराष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सुरक्षित असल्याची खात्री त्यांनी दिली.
या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डेंट्स डिनर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तीस दिवसांत नव्या तारखेस हा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हल्लेखोराकडून अनेक शस्त्रे जप्त
हल्लेखोराची ओळख 31 वर्षीय कोल थॉमस अ‍ॅलन अशी पटली असून तो कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याकडून अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, एका सुरक्षा अधिकार्‍यावर जवळून गोळीबार झाला होता. मात्र, त्याने घातलेल्या बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचा जीव वाचला. संबंधित अधिकार्‍याचे मनोबल उच्च असल्याचेही त्यांनी नमूद केले.

COMMENTS