Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. बालाजीराव कल्याणकर यांचे प्रयत्न फळाला; पीर बुऱ्हाण येथे लवकरच महावितरणच्या सबस्टेशन उभारणीला सुरुवात होणार

नांदेड : नांदेड उत्तर मतदार संघात मंजूर असलेल्या सबस्टेशनला महापालिकेच्या जागेमध्ये उभारण्यासाठी अखेर आ. बालाजीराव कल्याणकर यांचे प्रयत्न फळाला आ

बालमटाकळी येथील पाणीपुरवठा कर्मचारी यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न
राज्यात दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळात बदलाचे संकेत; प्रभावी ठसा न उमटवणार्‍या मंत्र्यांना शिंदे देणार डच्चू
मराठा उपसमिती बरखास्त करा : मनोज जरांगे
7 Main Components of a Distribution Substation

नांदेड : नांदेड उत्तर मतदार संघात मंजूर असलेल्या सबस्टेशनला महापालिकेच्या जागेमध्ये उभारण्यासाठी अखेर आ. बालाजीराव कल्याणकर यांचे प्रयत्न फळाला आले आहेत. पीरबुऱ्हाण येथील महानगरपालिकेच्या जागेवर हे सबस्टेशन स्थापन केले जाणार असून यासाठी महानगरपालिकेने ही हिरवा कंदील दाखवला आहे.
विजेची मागणी आणि पुरवठा यातील तफावतमुळे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित होतो आहे.  ग्राहकांना खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा प्रचंड फटका बसतो आहे. ही परिस्थिती लक्षात घेता नांदेड उत्तर मतदार संघामध्ये सब स्टेशन बसविण्यात यावेत यासाठी आ. बालाजीराव कल्याणकर यांनी प्रयत्न केले होते.  या प्रयत्नातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात सबस्टेशन मंजूर करण्यात आले होते. मंजूर सबस्टेशन पीर बुऱ्हाण येथील महानगरपालिकेच्या जागेत उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते.  त्यानुसार महापालिकेकडे जागेची मागणी करण्यात आली होती . महापालिकेकडून त्या जागे संदर्भात महावितरणला पत्र लिहून आम्हाला रेडी रेकनरच्या हिशोबाने जो भाव असेल त्या भावानुसार जमीन अधिग्रहित करावी. दिलासा म्हणून १०० टक्के रक्कम देण्यात यावी असे सांगितले होते. शिवाय महानगरपालिकेकडे महावितरणचे जे थकीत वीज बिल बाकी आहे त्यातून सदरील रक्कम कपात करावी यासाठी सुरुवातीच्या काळात महानगरपालिकेने महावितरणकडे प्रस्ताव ठेवला होता . परंतु महावितरणने महानगरपालिकेची ही अट मान्य केली नाही. त्यामुळे पीर बुऱ्हाण येथील महानगरपालिकेच्या  गुंठे जमिनीवर हे सब स्टेशन उभारण्याचा प्रश्न रेंगाळत पडला होता . परंतु आ. बालाजीराव कल्याणकर यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी अप्पर मुख्य सचिव लोकेशचंद्र यांना आदेशित करून संबंधित प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अप्पर मुख्य सचिव लोकेशचंद्र यांनी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्याशी संपर्क साधला. सदरील जागा हा जनकल्याणासाठी वापरण्यात येणार आहे.  असल्यामुळे शहरातील वीज वितरण व्यवस्थापन नीट होण्यासाठी आणि ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी महानगरपालिकेने १००% दिलासा रक्कम रद्द करावी . रेडी रेकनरच्या नियमानुसार जे दर होतील त्या हिशोबाने सदरील रक्कम महावितरणने थकीत बिलामधून वजा करावी आणि सब स्टेशन उभारण्यासाठी जागा द्यावी अशा सूचना दिल्या होत्या. या सूचनांना महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत अखेर सहमती दर्शवली. महावितरणकडून तसा प्रस्ताव सादर करावा अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.  त्यामुळे महानगरपालिकेच्या पीर बुऱ्हाण येथील ४० गुंठे जमिनीवर हे सब स्टेशन लवकरच उभारण्यात येणार आहे . वीज पुरवठ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या सब स्टेशनमुळे नांदेड उत्तर भागातील वीज पुरवठ्यावर येणारा ताण कमी होऊन ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा होईल असा विश्वास आ.बालाजीराव कल्याणकर यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS