Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समाजात परस्पर सन्मान वाढल्यास धर्मांतर कमी होतील : रामगिरी महाराज; देवळाली प्रवरा येथे विराट हिंदू संमेलन

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथे देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी, गुहा, जातप आदी गावांच्या वतीने आयोजित विराट हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज यांनी धर्म, समाज व वर्तमानातील विविध प्रश्नांवर भाष्य करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. रामगिरी महाराज यांनी आपल्या भाषणात मंदिरांच्या सरकारी ताब्याबाबत प्रश्न उपस्थित करत समाजाने धर्मपालन करताना सजग राहण्याचे आवाहन केले. वारकरी परंपरा सर्वसमावेशक असल्याचे सांगत अन्याय सहन न करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. समाजात परस्पर सन्मान वाढल्यास धर्मांतराच्या घटना कमी होतील, असेही त्यांनी नमूद केले. संमेलनानिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. सजविलेल्या फुलांच्या रथातून रामगिरी महाराज, मिलिंद वायकर व अर्जुन महाराज तनपुरे यांची पुष्पवृष्टी करण्यात आली. कदम पुतळ्यापासून निघालेल्या या शोभायात्रेत राम, लक्ष्मण, सीता, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, मावळे तसेच संत तुकाराम व संत नामदेव यांच्या देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. महिलांनी भगवे पताके हातात घेत ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. टाळ-मृदुंगाच्या तालावर नृत्य, तोफांची सलामी व फटाक्यांच्या आतषबाजीसह मिरवणूक बाजारतळावरील संमेलन स्थळी पोहोचली. कार्यक्रमाचे नियोजन नगराध्यक्ष सत्यजित कदम व प्रिती कदम यांनी केले. व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिलिंद वायकर, किशोर निर्मळ तसेच संत महिपती देवस्थानचे अर्जुन महाराज तनपुरे उपस्थित होते. प्रास्ताविक निमसे यांनी केले. या वेळी ह.भ.प. बाबानंद महाराज विर, नवनाथ महाराज म्हस्के, माजी आमदार चंद्रशेखर कदम,नगराध्यक्ष सत्यजित कदम ,प्रिती कदम, माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम,भरत निमसे,बाबासाहेब महाराज वाळुंज, बाबा महाराज मोरे, नामदेव महाराज जाधव, संपत महाराज जाधव, बापू महाराज कोतकर, संजय महाराज शेटे, आबा महाराज कोळसे आदींसह मोठ्या संख्येने भाविक व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चव्हाण यांनी तर स्वागत बाळासाहेब आढाव यांनी केले. कार्यक्रमानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सप्ताहासाठी भाविकांची आग्रही मागणी देवळाली प्रवरा येथील भाविकांनी महंत रामगिरी महाराज यांच्याकडे २०२७ मध्ये होणारा १८० वा सद्गुरू गंगागिरी महाराज सप्ताह देवळाली प्रवरा पंचक्रोशीला मिळावा, अशी मागणी केली. १९२७ साली येथे ८१ वा सप्ताह पार पडला होता. पुढील वर्षी या परंपरेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने माजी आमदार चंद्रशेखर कदम पाटील, नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील, प्रिती कदम, राजेंद्र चव्हाण, कांता पाटील कदम आदींसह भाविकांनी सप्ताहासाठी आग्रही भूमिका मांडली.

महापुरुषांना जातीत अडकवू नका : शहाजी डोके
महात्मा बसवेश्‍वर यांची ’अक्षय’ विचारधारा सर्वात प्रभावी : डॉ. उपाध्ये
प्रज्ञाशोध परीक्षेत समर व सक्षम यशस्वी

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथे देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी, गुहा, जातप आदी गावांच्या वतीने आयोजित विराट हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज यांनी धर्म, समाज व वर्तमानातील विविध प्रश्नांवर भाष्य करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. रामगिरी महाराज यांनी आपल्या भाषणात मंदिरांच्या सरकारी ताब्याबाबत प्रश्न उपस्थित करत समाजाने धर्मपालन करताना सजग राहण्याचे आवाहन केले. वारकरी परंपरा सर्वसमावेशक असल्याचे सांगत अन्याय सहन न करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. समाजात परस्पर सन्मान वाढल्यास धर्मांतराच्या घटना कमी होतील, असेही त्यांनी नमूद केले.

संमेलनानिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. सजविलेल्या फुलांच्या रथातून रामगिरी महाराज, मिलिंद वायकर व अर्जुन महाराज तनपुरे यांची पुष्पवृष्टी करण्यात आली. कदम पुतळ्यापासून निघालेल्या या शोभायात्रेत राम, लक्ष्मण, सीता, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, मावळे तसेच संत तुकाराम व संत नामदेव यांच्या देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. महिलांनी भगवे पताके हातात घेत ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. टाळ-मृदुंगाच्या तालावर नृत्य, तोफांची सलामी व फटाक्यांच्या आतषबाजीसह मिरवणूक बाजारतळावरील संमेलन स्थळी पोहोचली.

कार्यक्रमाचे नियोजन नगराध्यक्ष सत्यजित कदम व प्रिती कदम यांनी केले. व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिलिंद वायकर, किशोर निर्मळ तसेच संत महिपती देवस्थानचे अर्जुन महाराज तनपुरे उपस्थित होते. प्रास्ताविक निमसे यांनी केले.

या वेळी ह.भ.प. बाबानंद महाराज विर, नवनाथ महाराज म्हस्के, माजी आमदार चंद्रशेखर कदम,नगराध्यक्ष सत्यजित कदम ,प्रिती कदम, माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम,भरत निमसे,बाबासाहेब महाराज वाळुंज, बाबा महाराज मोरे, नामदेव महाराज जाधव, संपत महाराज जाधव, बापू महाराज कोतकर, संजय महाराज शेटे, आबा महाराज कोळसे आदींसह मोठ्या संख्येने भाविक व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चव्हाण यांनी तर स्वागत बाळासाहेब आढाव यांनी केले. कार्यक्रमानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

सप्ताहासाठी भाविकांची आग्रही मागणी

देवळाली प्रवरा येथील भाविकांनी महंत रामगिरी महाराज यांच्याकडे २०२७ मध्ये होणारा १८० वा सद्गुरू गंगागिरी महाराज सप्ताह देवळाली प्रवरा पंचक्रोशीला मिळावा, अशी मागणी केली. १९२७ साली येथे ८१ वा सप्ताह पार पडला होता. पुढील वर्षी या परंपरेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने माजी आमदार चंद्रशेखर कदम पाटील, नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील, प्रिती कदम, राजेंद्र चव्हाण, कांता पाटील कदम आदींसह भाविकांनी सप्ताहासाठी आग्रही भूमिका मांडली.

COMMENTS