जामखेड : शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या लोंढे हॉस्पिटलमध्ये शबनम दस्तगीर सय्यद (वय २९) या नर्सने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र बाथरुममध्ये इंजेक्शनची सुई सापडली आहे. स्वतःच इंजेक्शन लाऊन घेत आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. याबाबत मयतचे वडील दस्तगीर सय्यद (वय ५५, रा. पोकळे वस्ती, जामखेड) यांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यांची मुलगी शबनम दस्तगीर सय्यद ही लोंढे हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. गुरुवारी (दि. २३) सकाळी १० वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. सकाळी साडेदहा वाजता ती हाँस्पीटलमधील बाथरूममध्ये गेली, मात्र बराच वेळ ती बाहेर आली नाही. त्यामुळे स्टाफने दरवाजा तोडून पाहिले असता, ती बेशुद्धावस्थेत बाथरूम मध्ये आढळून आली. डॉक्टरांनी पाहीले असता ती मृत झाल्याचे दिसून आले. नंतर तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी २.३० वाजता डॉक्टरांनी शबनम हिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नर्स शबनम दस्तगीर ही विवाहित असून, तिला पाच व सहा वर्षांची दोन मुले आहेत. घटस्फोट झाल्याने गेल्या काही वर्षांपासून ती माहेरी वडिलांकडे जामखेड येथे राहत होती. जामखेड शहरातील लोंढे हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणू कार्यरत होती. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही तरी पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.

जामखेड : शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या लोंढे हॉस्पिटलमध्ये शबनम दस्तगीर सय्यद (वय २९) या नर्सने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र बाथरुममध्ये इंजेक्शनची सुई सापडली आहे. स्वतःच इंजेक्शन लाऊन घेत आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत मयतचे वडील दस्तगीर सय्यद (वय ५५, रा. पोकळे वस्ती, जामखेड) यांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यांची मुलगी शबनम दस्तगीर सय्यद ही लोंढे हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. गुरुवारी (दि. २३) सकाळी १० वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. सकाळी साडेदहा वाजता ती हाँस्पीटलमधील बाथरूममध्ये गेली, मात्र बराच वेळ ती बाहेर आली नाही. त्यामुळे स्टाफने दरवाजा तोडून पाहिले असता, ती बेशुद्धावस्थेत बाथरूम मध्ये आढळून आली. डॉक्टरांनी पाहीले असता ती मृत झाल्याचे दिसून आले. नंतर तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी २.३० वाजता डॉक्टरांनी शबनम हिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नर्स शबनम दस्तगीर ही विवाहित असून, तिला पाच व सहा वर्षांची दोन मुले आहेत. घटस्फोट झाल्याने गेल्या काही वर्षांपासून ती माहेरी वडिलांकडे जामखेड येथे राहत होती. जामखेड शहरातील लोंढे हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणू कार्यरत होती. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही तरी पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.

COMMENTS