Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रकचा टायर फुटून दुचाकीस्वार महिलेला गंभीर दुखापत

अर्धापूर : नांदेड-हिंगोली मार्गावरील दाभड येथील जिओ पेट्रोल पंपासमोर गुरुवारी (दि. 23) दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणार्‍

माळशेज घाटात अहिल्यानगर एसटीचा आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक; ४ जणांचा जागीच मृत्यू, दोन मुलांसह ४ गंभीर जखमी!
जयपूर-बिहार महामार्गावर बसला भीषण आग; प्रवासी नसल्याने अनर्थ टळला!
पंजाबमध्ये बस अपघातात सहा जणांचा मृत्यू

अर्धापूर : नांदेड-हिंगोली मार्गावरील दाभड येथील जिओ पेट्रोल पंपासमोर गुरुवारी (दि. 23) दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणार्‍या 12 टायर ट्रकचा अचानक टायर फुटल्याने नियंत्रण सुटून दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरून एक दुचाकी भोकरहून नांदेडकडे जात होती. याचवेळी मागून येणार्‍या 12 टायर ट्रकचा टायर अचानक फुटला. टायर फुटल्यामुळे ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरील दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील विमलबाई मारोती भेदेवाड (वय 55, रा. मंगरूळ, ता. हिमायतनगर) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक राजू पाचंगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जखमी महिलेला तत्काळ नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. वारंवार होणार्‍या अपघातांमुळे या मार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांकडून प्रशासनाने या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी होत आहे.

COMMENTS