तेहरान/वॉशिंग्टन: पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अद्याप ठोस दिशा मिळालेली नाही. इराणने अमेरिकेसोबतच्या संभाव्य यु

तेहरान/वॉशिंग्टन: पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अद्याप ठोस दिशा मिळालेली नाही. इराणने अमेरिकेसोबतच्या संभाव्य युद्धविरामाबाबत कठोर भूमिका कायम ठेवत, निर्बंध उठवल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच सकारात्मक घडामोडी घडू शकतात, असा दावा केला आहे.
इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत युद्धविरामाचा प्रश्नच उद्भवत नाही. आर्थिक नाकेबंदी उठवली गेल्यासच चर्चेचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी नमूद केले. 22 एप्रिल रोजी संपलेल्या तात्पुरत्या युद्धविरामानंतर अमेरिकेकडून तो एकतर्फी वाढवण्यात आल्याचा आरोपही इराणकडून करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतता चर्चेच्या पुढील टप्प्याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यांच्या मते, पुढील 24 तासांत काही चांगली बातमी समोर येऊ शकते. काही आंतरराष्ट्रीय सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील 36 ते 72 तासांत नव्या चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनीही संवादासाठी तयारी दर्शवली असली, तरी विरोधकांकडून होणार्या धमक्या आणि आक्रमक कारवाया चर्चेच्या प्रक्रियेला अडथळा ठरत असल्याचे त्यांनी सूचित केले.

COMMENTS