Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोंभळी महसूल मंडळात महाराजस्व अभियान उत्साहात 

कर्जत : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर, उपविभागीय अधिकारी कर्जत व तहसीलदार कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने कोंभळी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्रमांक एक उत्साहात पार पडला. महसूल मंडळ कोंभळीच्या वतीने आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार रवी सतवन, नायब तहसीलदार श्री ठोंबरे यांच्या संकल्पनेतून तसेच मंडळ अधिकारी जेडगुले बी. के. यांच्या नियोजनानुसार हा कार्यक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी व युवकांच्या शासकीय कामातील अडचणी दूर करून आवश्यक दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी मुख्याध्यापक सुनील अर्जुन गोरखे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी यांनी शिबिराच्या आयोजनामागील उद्दिष्टे स्पष्ट केली. तहसीलदार रवी सतवन यांनी अध्यक्षीय भाषणात शासनाच्या विविध योजनांची माहिती देत आवश्यक कागदपत्रे सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या शिबिरात कोंभळी, खांडवी व कौडाणे येथील लाभार्थी, विद्यार्थी तसेच विशेष गरजा असलेल्या बालकांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच अंगणवाडीमार्फत मातांना आवश्यक साहित्यही देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांगदेव जायभाय यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रभारी प्राचार्य सुनील गोरखे व मंडळ अधिकारी जेडगुले बी. के. यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार जाधव, महिला व बाल विकास अधिकारी रोहिदास शिंदे, प्राथमिक आरोग्य केंद्र कोंभळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दळवी, तसेच विविध ग्राम महसूल अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे गरजू नागरिकांना आवश्यक कागदपत्रे गावातच मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. अशा प्रकारची शिबिरे सर्वत्र राबवावीत, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उत्खननावर चकलांबा पोलिसांची कारवाई; 15.03 लाखांचा मुद्देमाल जप्त
आरटीई प्रवेशाच्या कागदपत्र पडताळणीत गोंधळ;पालकांना करावी लागते तासंतास प्रतीक्षा; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे संताप
शिलाई मशिनच्या नावाखाली ४३९ महिलांना गंडा; लाखो रुपये घेऊन भामटा पसार!

कर्जत : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर, उपविभागीय अधिकारी कर्जत व तहसीलदार कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने कोंभळी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्रमांक एक उत्साहात पार पडला. महसूल मंडळ कोंभळीच्या वतीने आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार रवी सतवन, नायब तहसीलदार श्री ठोंबरे यांच्या संकल्पनेतून तसेच मंडळ अधिकारी जेडगुले बी. के. यांच्या नियोजनानुसार हा कार्यक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी व युवकांच्या शासकीय कामातील अडचणी दूर करून आवश्यक दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी मुख्याध्यापक सुनील अर्जुन गोरखे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी यांनी शिबिराच्या आयोजनामागील उद्दिष्टे स्पष्ट केली. तहसीलदार रवी सतवन यांनी अध्यक्षीय भाषणात शासनाच्या विविध योजनांची माहिती देत आवश्यक कागदपत्रे सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

या शिबिरात कोंभळी, खांडवी व कौडाणे येथील लाभार्थी, विद्यार्थी तसेच विशेष गरजा असलेल्या बालकांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच अंगणवाडीमार्फत मातांना आवश्यक साहित्यही देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांगदेव जायभाय यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रभारी प्राचार्य सुनील गोरखे व मंडळ अधिकारी जेडगुले बी. के. यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार जाधव, महिला व बाल विकास अधिकारी रोहिदास शिंदे, प्राथमिक आरोग्य केंद्र कोंभळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दळवी, तसेच विविध ग्राम महसूल अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे गरजू नागरिकांना आवश्यक कागदपत्रे गावातच मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. अशा प्रकारची शिबिरे सर्वत्र राबवावीत, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

COMMENTS