Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोंबिवलीत रेल्वे रूळावरून डबा घसराला

मुंबई : डोंबिवली स्थानकात सोमवारी सकाळी घडलेल्या रेल्वे अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून, कामावर जाणार्‍या प्रवाशांना

सहर शेखचे नगरसेवकपद धोक्यात; बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे वादळी वाऱ्यामुळे आपत्कालीन लँडिंग
ठाण्यात शिवशाही बस जळून खाक;15 प्रवासी थोडक्यात बचावले, प्रवाशांत भीतीचे वातावरण
Local Train Derailed Dombivli: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा फर्स्ट क्लासचा डबा  रुळावरुन घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ट्रेन 15 ते 20 मिनिटं  उशिराने ...

मुंबई : डोंबिवली स्थानकात सोमवारी सकाळी घडलेल्या रेल्वे अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून, कामावर जाणार्‍या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. गर्दीच्या वेळेतच घडलेल्या या घटनेने स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला.
डोंबिवली हे मध्य रेल्वेवरील अत्यंत वर्दळीचे स्थानक मानले जाते. सोमवारी सकाळी फलाट क्रमांक एकवरून कळवा येथील रेल्वे देखभाल केंद्रातून येणारी रिकामी लोकल गाडी स्थानकात प्रवेश करत असताना तिचा एक डबा अचानक रुळावरून घसरला. या घटनेमुळे रेल्वे मार्गावर अडथळा निर्माण झाला आणि काही काळ गाड्यांची ये-जा थांबली. या अपघाताचा थेट परिणाम मुंबईकडे आणि कल्याणकडे जाणार्‍या गाड्यांवर झाला. काही गाड्या उशिराने धावल्या, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली. कामाच्या पहिल्याच दिवशी अनेक चाकरमान्यांना उशीर झाला, तर काहींना पर्यायी प्रवासाची साधने शोधावी लागली. मात्र जलद मार्गावरील गाड्यांची ये-जा तुलनेने सुरळीत ठेवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. अपघाताच्या वेळी संबंधित लोकल गाडी रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. अन्यथा सकाळच्या गर्दीच्या वेळी ही घटना घडली असती, तर मोठा अनर्थ घडू शकला असता, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर रेल्वे सुरक्षेच्या बाबतीत प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकाराकडे गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण म्हणून पाहिले आहे. वारंवार सूचना देऊनही आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

COMMENTS