Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकसहभागातून जलक्रांती! बालमटाकळीत ९६० मीटर लांबीच्या बंधाऱ्याचे खोलीकरण सुरू

https://www.youtube.com/watch?v=dXbDNmZZCWA "पाणी आडवा व पाणी जिरवा" अशा वल्गना शासनाकडून केल्या जात असल्या तरी, उन्हाळ्यात होणे गरजेचे असले

शेवगामध्ये ट्रकच्या चाकाखाली चिरडून दोघांचा मृत्यू
महात्मा फुले भाजी मंडईतील भाजी बाजार पुन्हा रस्त्यावर
पुनर्वसित गावांसाठी पाच कोटींचा निधी  

“पाणी आडवा व पाणी जिरवा” अशा वल्गना शासनाकडून केल्या जात असल्या तरी, उन्हाळ्यात होणे गरजेचे असलेली बंधाऱ्यांची कामे अनेकदा कागदावरच राहतात. पावसाळा दीड महिन्यावर येऊन ठेपलेला असताना, छोटे-मोठे बंधारे उपसणे गरजेचे आहे. हीच निकड ओळखून शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे लोकसहभाग आणि कॉर्पोरेट मदतीतून जलसंधारणाचे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
येथील ९६० मीटर लांबी असलेल्या ‘देशमुख राजपुरे’ या मोठ्या बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाला अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली. हे काम ‘भारत फोर्ज कंपनी, पुणे’ आणि बंधाऱ्याच्या आसपास असलेल्या शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून पूर्ण केले जाणार आहे.
पावसाचे पाणी या बंधाऱ्यात साठल्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत मोठी वाढ होते, ज्याचा थेट फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होतो. मात्र, गाळ साचल्यामुळे या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. आता रुंदीकरण आणि खोलीकरणामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठा होणार असून, परिसरातील शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
या कामाचा भूमिपूजन सोहळा ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथजी राजपुरे, सरपंच डॉ. राम बामदळे, युवा उद्योजक पांडुरंग नवले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश काजवे, राजेश छाजेड, मेजर बाळासाहेब शेळके, धनंजय देशमुख, रमेश शिंदे, बप्पासाहेब भाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

शासकीय मदतीची वाट न पाहता, लोकसहभागातून सुरू असलेल्या या कामाचे परिसरातून कौतुक होत आहे.

COMMENTS