Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिम अनुयायांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप; तीन अधिकार्‍यांवर निलंबन व कारवाईची मागणी

बीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2026 रोजी बीड शहरात पार पडलेल्या भव्य मिरवणुकीदरम्यान प्रशासनाच्या न

‘भीमशक्ती’ संघटनेकडून विद्यार्थ्यांना महापुरुषांची पुस्तके वाटप
डॉ. आंबेडकरांचे उपकार विसरू नयेत : चौरे 
मिरजगावात डॉ. आंबेडकर यांना महामानवंदना

बीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2026 रोजी बीड शहरात पार पडलेल्या भव्य मिरवणुकीदरम्यान प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत संबंधित तीन अधिकार्‍यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा माजी नगरसेवक ड. विकास जोगदंड यांनी जिल्हाधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षा यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. यावेळी शिष्टमंडळामध्ये ड. मिलिंद वाघमारे, मंगेश जोगदंड, सत्यभान जाधव, राजेश कोकाटे, महादेव वंजारे, विष्णू गायकवाड आदी उपस्थित होते. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बशीरगंज चौक, माळवेस मार्गे डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो नागरिक, महिला, वृद्ध तसेच लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र, या मिरवणूक मार्गावर आवश्यक स्वच्छता व्यवस्था, दुरुस्ती तसेच सुरक्षितता उपाययोजना करण्यात प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वच्छता विभाग प्रमुख गणेश पगारे यांनी मार्गावरील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याचा, तर बांधकाम विभागाचे अभियंता किरण देशमुख यांनी खड्डे बुजवण्यासाठी केवळ कच्ची खडी टाकून काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे दुचाकीस्वार व पादचारी घसरून पडून जखमी झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रमोद माने यांनी नियोजन न केल्यामुळे मिरवणूक काळात पाईपलाईन किंवा वाल्वमधून मोठ्या दाबाने पाणी सोडले गेले, परिणामी गटारातील सांडपाणी रस्त्यावर आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मिरवणूक मार्ग गटारासारखा झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले, असेही निवेदनात म्हटले आहे. या परिस्थितीमुळे महिला, वृद्ध, बालक तसेच सर्व सहभागी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अप्रत्यक्ष अपमान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित तीन अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. तसेच अभियंता प्रमोद माने आणि किरण देशमुख यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ट्रॉसिटी क्ट) गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या निवेदनावर प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

COMMENTS