बीड : श्रीसंत भगवानबाबा व श्रीसंत वामनभाऊ प्रतिष्ठान, इंद्रप्रस्थ कॉलनी, नगररोड बीड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत वामनभाऊ, संत भगवानबाबा, सं

बीड : श्रीसंत भगवानबाबा व श्रीसंत वामनभाऊ प्रतिष्ठान, इंद्रप्रस्थ कॉलनी, नगररोड बीड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत वामनभाऊ, संत भगवानबाबा, संत तुकाराम, विठ्ठल-रुक्मिणी तसेच हनुमान देवतेच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त त्रिदिवसीय हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 19 एप्रिल 2026 ते 21 एप्रिल 2026 या कालावधीत होणार्या या धार्मिक सोहळ्यात सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात येणार आहे. या सप्ताहाचा प्रारंभ दि. 19 एप्रिल रविवार रोजी रात्री 8 वाजता होणार असून, या दिवशी ह.भ.प. डॉ. विक्रम महाराज सारूक यांचे कीर्तन होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास इंद्रप्रस्थ कॉलनी परिसरातील तसेच बीड शहरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन व हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा श्रीसंत भगवानबाबा व श्रीसंत वामनभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भाऊ सानप तसेच प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे. या त्रिदिवसीय कार्यक्रमात विविध धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS