Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

कांदेवाडी येथे कै. शिवाजीराव खाडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हरिनाम सप्ताह

धारूर : कांदेवाडी (ता. धारूर) येथील कै. शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल

माका येथे नारळी सप्ताहाची उत्साहात सांगता
श्रीसंत भगवानबाबा व संत वामनभाऊ प्रतिष्ठान, इंद्रप्रस्थ कॉलनी बीड येथे त्रिदिवसीय हरिनाम सप्ताहाचे आयोजन; 19 एप्रिल रोजी डॉ. विक्रम सारूक यांचे कीर्तन
मुक्रमाबाद येथे संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न;ह.भ.प. रंगनाथ महाराज कंधारकर यांच्या कीर्तनाने मुक्रमाबाद नगरी दुमदुमली

धारूर : कांदेवाडी (ता. धारूर) येथील कै. शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने हरिनामाचा गजर, कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
रविवार, 19 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 ते 11 या वेळेत श्री गोरक्षनाथ आखाडा, पीलखेडा-सिंदखेड येथील ह.भ.प. श्री. योगी दत्तनाथजी महाराज यांचे सुश्राव्य हरिकिर्तन होणार आहे. तसेच सोमवार, 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत भागवताचार्य ह.भ.प. श्री. माऊली महाराज कोठुळे (भिवंडी) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमास परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रदीप शिवाजीराव खाडे, विलास शिवाजीराव खाडे व बालासाहेब शिवाजीराव खाडे यांनी केले आहे. कै. शिवाजीराव खाडे हे बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी शाखाधिकारी होते. त्यांनी परळी, आंबेजोगाई, बीड, घाटानांदूर व धर्मापुरी या शाखांमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्य केले होते. शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. रामायणाचे गाढे अभ्यासक तसेच कांदेवाडीतील पहिले पदवीधर म्हणून त्यांची विशेष ओळख होती. धारूर तालुक्यासह बीड जिल्ह्यात एक ज्येष्ठ, सुसंस्कृत व सर्वपरिचित व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा मोठा मान होता. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS