संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून तालुक्याच्या विकासाचा पाया घातला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शेती, शिक्षण,सहकार,दुग्धविका

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून तालुक्याच्या विकासाचा पाया घातला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शेती, शिक्षण,सहकार,दुग्धविकास,आर्थिक समृद्धीतून हा तालुका विकासातून पुढे नेला. युवकांनी इतिहास कधीही विसरू नाही असे सांगताना युवक काँग्रेसचा हा कार्यक्रम इतिहासाचे मार्गदर्शन घेऊन भविष्याची दिशा ठरवणारा असल्याचे गौरवउद्गार विधिमंडळ पक्षाचे गटनेते माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी काढले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखाना कार्यस्थळावर संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने आयोजित युवा संगम कार्यकर्ता प्रशिक्षण आणि संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर दुर्गाताई तांबे, ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे आदींसह युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या युवा संवाद कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री आ.सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले की, संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे शेती, सहकार, शिक्षण, आर्थिक समृद्धी अशा सर्व क्षेत्रांमध्ये राज्याला दिशा देत आहे. आपल्या राज्याला आणि देशाला मोठा समृद्ध इतिहास आहे. अनेक राष्ट्रपुरुषांनी हा देश स्वातंत्र्य केल्यानंतर आज स्वकर्तृत्वातून जगापुढे उभा करण्यामध्ये मोठा वाटा उचलला आहे. त्यांचा आदर आपण केलाच पाहिजे. हा चांगला इतिहासाचा वारसा घेऊन आपल्याला देश घडवायचा आहे. भाजप प्रणित आघाडी काँग्रेसचा विचार मोडीत काढण्यासाठी सर्व उपाय करत आहेत. खोटा इतिहास आणि माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवरून पसरवली जात आहे.
माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, 2024 च्या घटनेने राज्य हळहळले. आपत्ती मधून इष्टापत्ती निर्माण करायची असते. नव्याने सर्वांना बरोबर घेत पुढे जायचे आहे. तालुक्याची दिशा ठरवायचे आहे. सामान्य माणसाच्या हिताचा विचार करून जे काम करतात त्यांच्या पाठीशी गोरगरिबांची ताकद असते. आपण हिंदू आहोत.पण दुसऱ्याचे द्वेष करणारे नाही. संत आणि वारकरी संप्रदायाचा वारसा आणि राज्यघटनेचे विचार आपल्या सर्वांना पुढे न्यायचे आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की, संगमनेरने आमच्यावर कायम प्रेम केले. निळवंडे धरणाचे पाणी थोरात साहेबांमुळे या भागाला मिळाले असून काही लोक श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जीवनात अपघात घडतात. मात्र त्यांनी खचून न जाता लढण्यासाठी तयार राहा असे आवाहन केले.

COMMENTS