Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी काँगे्रसचे सहा दावेदार ?थोरात, सपकाळ, हुसेन, सावंत, पवार यांची नावे चर्चेत

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, महाविकास आघाडीत जागावाटपावरून नवी चुरस

जोर्वे संस्कृतीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन
राजकीय हस्तक्षेपामुळे संगमनेरचा रेल्वे मार्ग बदललामाजी मंत्री थोरात ; वाढत्या हप्तेखोरी व टक्केवारीबाबत चिंता व्यक्त
स्व. विलासराव देशमुख जनतेप्रती बांधिलकी जपणारे नेते; माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे प्रतिपादन


मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, महाविकास आघाडीत जागावाटपावरून नवी चुरस निर्माण झाली आहे. एकूण 9 जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीत एका जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील रस्सीखेच केंद्रस्थानी आली आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार 23 एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर होणार असून, 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 2 मे रोजी छाननी, 4 मेपर्यंत माघार आणि 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता भारतीय जनता पक्षाला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आघाडीच्या वाट्याला येणार्‍या एकमेव जागेसाठीच सर्वाधिक राजकीय हालचाली सुरू आहेत. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः निवडणूक लढवणार की दुसर्‍या नेत्याला संधी देणार, याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. त्यांच्या निर्णयावरच या जागेचे समीकरण मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे.काँग्रेसनेही आपले दावे मजबूत करण्यासाठी तयारी सुरू केल्याचे दिसते. पक्षातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत, हनमंत पवार आणि राजेश राठोड या नेत्यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. या सर्वांनी इच्छुकता दर्शविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडे जावी, यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, जर उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवली नाही, तर शिवसेनेतूनही अनेक पर्याय पुढे येत आहेत. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे, वैभव नाईक आणि सूरज चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे या जागेसाठी शिवसेनेतही अंतर्गत स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत काही विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्यानेही स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. त्यात उद्धव ठाकरे, नीलम गोर्‍हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे. तसेच प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी पोटनिवडणूकही होणार असल्याने एकूण समीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
आघाडीला केवळ एकच जागा मिळणार
महाविकास आघाडीत या एकमेव जागेवरून अंतिम निर्णय होणे हेच सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. काँग्रेसने पर्याय खुले ठेवले असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतच्या चर्चेनंतरच चित्र स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावरच या निवडणुकीतील आघाडीचे राजकारण आणि पुढील समीकरणे ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

COMMENTS