Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्व. विलासराव देशमुख जनतेप्रती बांधिलकी जपणारे नेते; माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे प्रतिपादन

संगमनेर : "स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर भावाप्रमाणे प्रेम केले आणि लातूरनंतर संगमनेरच्या विकासाला नेहमी प्राध

‘गणेश’ला विखे कारखान्याचा अडथळा सुरूच; न्यायालयीन व आर्थिक दबावाचा सुधीर लहारेंचा गंभीर आरोप
संभाजी ब्रिगेडच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी सोमनाथ गोडसे; तर उपाध्यक्षपदी शाम पोळ
वृद्धांसाठी घरपोच ‘हयाती’ची नोंदणी; कर्जतमधील नगरसेविका नीता कचरे यांचा अनोखा उपक्रम

संगमनेर : “स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर भावाप्रमाणे प्रेम केले आणि लातूरनंतर संगमनेरच्या विकासाला नेहमी प्राधान्य दिले. त्यांची व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि कार्यशैली अगदी सारखीच होती. ते संगमनेरकरांच्या कायम हृदयात राहतील, विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे अत्यंत कर्तबगार मुख्यमंत्री होते,” असे गौरवोद्गार जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी नवनाथ आरगडे, सुभाष सांगळे, सुधाकर जोशी, ॲड. त्रंबक गडाख, ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप जोशी, बाळासाहेब पवार, बाळासाहेब गायकवाड, भास्कर शर्माळे, जावेद शेख, अनिता दिघे, शितल उगलमुगले, अमित गुंजाळ, तात्याराम कुटे यांच्यासह विविध कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, “विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी थोरात साहेबांकडे दिली होती. दोघांचेही विचार जुळणारे होते आणि शेतकरी व सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी कायम विकासाला प्राधान्य दिले.”

विलासराव देशमुख यांचे रुबाबदार आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व, प्रभावी वक्तृत्व, सर्वसामान्यांबद्दलची तळमळ, हजरजबाबीपणा आणि राजकारणविरहित सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले स्नेहाचे संबंध यांमुळेच त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान दिले, असेही तांबे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

COMMENTS