चिखली : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे शिवधर्माचे संस्थापक तसेच मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांची दैनिक लोकमंथनचे मुख्य

चिखली : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे शिवधर्माचे संस्थापक तसेच मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांची दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक डॉ. अशोक सोनवणे यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही मान्यवरांमध्ये सामाजिक चळवळींचा प्रवास, सध्याची परिस्थिती आणि पुढील दिशा यावर सविस्तर व चिंतनशील चर्चा झाली.
यावेळी डॉ. अशोक सोनवणे यांनी स्वतः संपादित केलेले ‘गतिमान महाराष्ट्राचा शिल्पकार’ हे पुस्तक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांना भेट म्हणून प्रदान केले. गतिमान महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणजे प्रेरणेचा दीपस्तंभ असल्याचे गौरवौद्गार शिवश्री खेडेकर यांनी काढले. या पुस्तकांमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेतला असून, अनेक मान्यवरांनी आणि अभियंत्यांनी लेख लिहले आहे. त्याबद्दल खेडेकर यांनी समाधान व्यक्त केले. यावेेळी खेडेकर आणि सोनवणे यांच्यातील चर्चेदरम्यान सामाजिक संघटनांची आजची भूमिका, युवकांचा सहभाग, बदलती सामाजिक मूल्ये आणि संघटनांसमोरील आव्हाने यावर सखोल विचारमंथन झाले. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी विचारप्रबोधन, संघटनबांधणी आणि सातत्यपूर्ण कार्याची गरज असल्याचे दोघांनीही अधोरेखित केले. तसेच, ग्रामीण भागातील सामाजिक चळवळी अधिक प्रभावी करण्यासाठी नव्या पिढीला जोडणे, तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि सामाजिक एकात्मता दृढ करणे या बाबींवरही चर्चा झाली. समाजहितासाठी कार्यरत असलेल्या संस्थांनी समन्वयाने काम केल्यास व्यापक परिवर्तन साधता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS