Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

नेकनूर : प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, नेकनूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (छडड) विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच

लिंबागणेश येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन
महात्मा ज्योतिबा फुले समग्र क्रांतीचे प्रणेते-आनंद  गायकवाड
डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृतांच्या जीवनात आत्मसन्मानाचे बीज पेरले – डॉ. सतीश साळुंके
प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी… – Rani Laxmibai  Mulinchi Sainiki Shala

नेकनूर : प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, नेकनूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (छडड) विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.के. ढास उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. व्ही.बी. मातकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस.टी. मुजावर यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. व्ही.एस. इनकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉ. व्ही.बी. मातकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 18-18 तास अभ्यास करून यश संपादन केले. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश त्यांनी समाजाला दिला आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांनी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. डी.के. ढास यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांचा समाजासाठी आणि देशासाठीचा त्याग महान आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांचा स्वीकार करून त्यांचे विचार आचरणात आणावेत. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. डी.के. रामरुळे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS