माहूर : माहूर शहरातील अनु. जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती

माहूर : माहूर शहरातील अनु. जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांची प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थिनींना डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याबद्दल मार्गदर्शन करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक सचिन जोशी, शिक्षक व्ही. बी. शिंदे, ए. एल. इंगोले, एस. एल. चव्हाण, आर. पी. राठोड तसेच शिक्षिका एस. जी. डोंगरे, एस. एम. कापसे, एस. एम. पोटे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

COMMENTS