शहरटाकळी : येथील महालक्ष्मी मातेच्या दोन दिवसीय यात्रोत्सवाची सांगता कुस्त्यांच्या जंगी हंगाम्याने झाली. सर्व जाती-धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी मातेच्या यात्रेला यंदा भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून दोन दिवस मोठी गर्दी पाहायला मिळाली.यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रविवारी (दि. १३) दुपारनंतर आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी हंगाम्याने यात्रेची रंगत अधिकच वाढवली. राज्यभरातून आलेल्या नामांकित पैलवानांनी आपल्या ताकदीचे व कौशल्याचे दर्शन घडवित प्रेक्षकांची मने जिंकली.या कुस्त्यांमध्ये विजेत्या पैलवानांना ५०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत रोख बक्षिसे देण्यात आली. यात्रेतील अखेरची व मानाची समजली जाणारी कुस्ती शहरटाकळीचे भूमिपुत्र, उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान सागर कोल्हे आणि पैलवान कृष्णा पवार यांच्यात रंगली. ही कुस्ती अत्यंत चुरशीची व लक्षवेधी ठरली.या मानाच्या कुस्तीचा शुभारंभ यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष ऍड. अनिलराव मडके पाटील, भाऊसाहेब राजळे, माजी सरपंच अण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब मडके आदींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कुस्तीप्रेमी उपस्थित होते. विशेष म्हणजे यंदाच्या कुस्त्यांमध्ये महिला कुस्तीपटूंनीही उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यांच्या लढतींनाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूणच चित्तथरारक आणि रंगतदार कुस्त्यांच्या हंगाम्याने महालक्ष्मी मातेच्या यात्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली.

COMMENTS