Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डी.एड. शिक्षण शुल्कवाढीसाठी शेवगावात सहविचार सभावाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडे पाठपुराव्याचा निर्धार

शेवगाव : कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह, शेवगाव अंतर्गत आबासाहेब काकडे डी.एड. कॉलेज तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील विनाअनुदानित अध्यापक विद्यालयांच्या प्राचार्य व प्रतिनिधींची शिक्षण शुल्कवाढीच्या संदर्भात सहविचार सभा पार पडली. या सभेत शुल्कवाढीचा प्रश्न सोडवण्यासाठी संघटितपणे शासनदरबारी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.या सभेच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक समूहाचे सर्वेसर्वा ऍड. डॉ. विद्याधर काकडे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वी काकडे तसेच उच्च शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत गांगुर्डे उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी प्राचार्य कांबळे यांनी प्रास्ताविक करताना डी.एड. महाविद्यालयांच्या शिक्षण शुल्कवाढीची आवश्यकता स्पष्ट केली. शिक्षकांचे वेतन, इमारत भाडे, स्टेशनरी, दुरुस्ती, विज्ञान साहित्य, वीजबिल तसेच ग्रंथालयासाठी आवश्यक पुस्तकांच्या वाढत्या खर्चामुळे सध्याचे शुल्क अपुरे ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी संघटनेमार्फत एमएससीईआरटीकडे निवेदन सादर करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.यावेळी डॉ. हेमंत गांगुर्डे यांनी शुल्कवाढीसाठी आवश्यक असलेल्या शासकीय प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. ठोस प्रस्ताव तयार करून त्यामध्ये शुल्कवाढीच्या तरतुदी नमूद करत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय भाषणात  ऍड.डॉ. विद्याधर काकडे यांनी सांगितले की, सन २००३ पासून डी.एड. शिक्षण शुल्कात कोणताही बदल झालेला नाही. सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केवळ १२ हजार रुपयांच्या शुल्कात संस्था चालविणे अशक्य झाले असून विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे व शिक्षकांचे वेतन वाढविणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अध्यापक विद्यालयांची संघटना मजबूत करून शासनदरबारी प्रभावी पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले.सभेचे आभार  प्रा. गायकवाड यांनी मानले. या सहविचार सभेसाठी चेचरे,  शिंदे,  चोथे,  सादिक,  नेहुल,   विद्या थोरे,  शिर्के, नवल, आघाव आदींसह जिल्ह्यातील विविध विनाअनुदानित अध्यापक विद्यालयांचे प्राचार्य, पदाधिकारी व प्राध्यापक उपस्थित होते

पेपरफुटीच्या गोंधळानंतर मुख्यमंत्री विजय यांची मोठी मागणी; नीट परीक्षा बंद करून १२वीच्या गुणांवरच द्या मेडिकल प्रवेश!
22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात पेपर लीक प्रकरणात सीबीआय चौकशी करा- नितीन सोनवणेभारत सरकारचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या
उपविभागीय अधिकारी भूम यांना धाराशिव जिल्हा एन.एस.यु.आय.चे निवेदन

COMMENTS