Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महादेव कोळी समजातील जाधव भावकीचा आज स्नेह मेळावा

अकोले : सह्याद्री व कोळवण परिसरातील महादेव कोळी समाजातील जाधव भावकीचा स्नेहमेळावा रविवारी (दि. १२ एप्रिल) कोकणवाडी येथील बाल भैरवनाथ मंदिरासमोर आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून दुरावलेली नाती पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.  डिजिटल युगात मोबाईल व तंत्रज्ञानामुळे समाजातील नातेसंबंध दूर जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भावकीतील ऐक्य वाढविणे, सांस्कृतिक वारसा जपणे व आदिवासी परंपरेचा सन्मान करणे, हा या स्नेहमेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. भावकी ही रक्ताच्या नातेसंबंधांवर आधारित असलेली एक सामाजिक रचना असून परस्परांना आधार देत एकत्र येण्याची परंपरा यातून जपली जाते.  शनिवारी (दि. ११) सायंकाळी मोठ्यादेवाचे पूजन व धरतीवंदना करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. यानंतर मान्यवरांचे स्वागत, स्नेहभोजन व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. रविवारी (दि. १२) सकाळी १० वाजता आदिवासी संस्कृती, जीवनशैली, लोककला व परंपरा जपण्याबाबत व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. तसेच तरुणांच्या शैक्षणिक व व्यावसायिक समस्यांवर मार्गदर्शन होणार आहे. सकाळी ११ वाजता महिलांचा सहभाग सन्मानित करण्यात येणार असून सामाजिक व भावकी कार्यात योगदान देणाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे. दुपारी १ वाजता सामूहिक भोजन, तर दुपारी ३ वाजता पुढील उपक्रमांबाबत चर्चा, सूचना व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.या स्नेहमेळाव्यास महादेव कोळी समाजातील जाधव भावकीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

अकोलेत कुपोषणाचे सावट गडद;३८ तीव्र कुपोषित, ३३८ मध्यम कुपोषित बालके; अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर नियुक्तीची गरज
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा; अकोले दिव्यांग क्रांती संघटनेची मागणी
अकोले तालुका माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी मुंदडा, मंत्रीपदी राठी

अकोले : सह्याद्री व कोळवण परिसरातील महादेव कोळी समाजातील जाधव भावकीचा स्नेहमेळावा रविवारी (दि. १२ एप्रिल) कोकणवाडी येथील बाल भैरवनाथ मंदिरासमोर आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून दुरावलेली नाती पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 डिजिटल युगात मोबाईल व तंत्रज्ञानामुळे समाजातील नातेसंबंध दूर जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भावकीतील ऐक्य वाढविणे, सांस्कृतिक वारसा जपणे व आदिवासी परंपरेचा सन्मान करणे, हा या स्नेहमेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. भावकी ही रक्ताच्या नातेसंबंधांवर आधारित असलेली एक सामाजिक रचना असून परस्परांना आधार देत एकत्र येण्याची परंपरा यातून जपली जाते.

 शनिवारी (दि. ११) सायंकाळी मोठ्यादेवाचे पूजन व धरतीवंदना करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. यानंतर मान्यवरांचे स्वागत, स्नेहभोजन व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

रविवारी (दि. १२) सकाळी १० वाजता आदिवासी संस्कृती, जीवनशैली, लोककला व परंपरा जपण्याबाबत व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. तसेच तरुणांच्या शैक्षणिक व व्यावसायिक समस्यांवर मार्गदर्शन होणार आहे. सकाळी ११ वाजता महिलांचा सहभाग सन्मानित करण्यात येणार असून सामाजिक व भावकी कार्यात योगदान देणाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे. दुपारी १ वाजता सामूहिक भोजन, तर दुपारी ३ वाजता पुढील उपक्रमांबाबत चर्चा, सूचना व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.या स्नेहमेळाव्यास महादेव कोळी समाजातील जाधव भावकीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

COMMENTS