कर्जत : सत्यशोधक डॉ. अण्णा भाऊ साठे दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नुकतेच दादा पाटील महाविद्यालयात उत्साहात पार पडले. या संमेलनातील ग्रंथदिंडी कर्जतकरांसाठी विशेष आकर्षण ठरली.समेलनाच्या अध्यक्षपदी माजी आ. लहू कानडे होते. उद्घाटक प्राध्यापक मच्छिंद्र सकटे, नितीन चंदनशिवे, संदीप सांगळे, डॉ. बापू चंदनशिवे, स्वागताध्यक्ष सुरेश गोरखे, प्रा. संजय नगरकर, वसंतराव सकट, चंद्रकांत काळोखे, अनिल गुंजाळ, मधुकर अनाप, शर्मिला गोसावी, सुनील गोसावी, भगवान राऊत, भारत गाडेकर, प्रतिभा भैलुमे, हर्षदा कालदाते, स्वप्निल लोंढे, मेघराज बजाज, रमेश लांगोरे, धनसिंग भोईटे, डॉ.पांडुरंग बाणखेले, अक्षय गरडकर आदी मान्यवर उपस्थित होते.या संमेलनामध्ये दादा पाटील महाविद्यालयाचे व सौ.सो.ना. सोनमाळी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेली ग्रंथ दिंडी कर्जतकरांसाठी विशेष आकर्षण ठरली. यात डॉ.अण्णा भाऊ साठे यांची प्रतिमा व त्यांचे पुस्तके व निवडक खंड ठेवण्यात आले होते. ग्रंथदिंडीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम महाराणी येसूबाई यांच्या वेशभूषेसाठी आरती माने यांना, द्वितीय राजमाता जिजाऊ वेशभूषेसाठी ऋतुजा कदम तर तृतीय क्रमांक सावित्रीमाई फुले वेशभूषेसाठी श्रावणी जगधने या विद्यार्थिनींना देण्यात आला.या संमेलनाचे आयोजन कर्जत तालुका साहित्य प्रेमी मंडळ व दादा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कर्जत तालुका साहित्य प्रेमी मंडळाचे अध्यक्ष तानाजी डाडर, सचिव नवनाथ केंदळे, उपाध्यक्ष प्रा. देविदास राऊत, सहसचिव पांडुरंग आडागळे, संघटक राघू जगधने, कोषाध्यक्ष संजय शेलार, ऍड.नितीन लोंढे, महेंद्र जगधने, दिनेश आडागळे, अक्षय डाडर, संभाजी डाडर, दत्ता घोडके, चंद्रकांत डोलारे, विनायक गोरखे, चंदन भिसे, डॉ. राजेंद्र पवार, जयराम शेंडगे, भाऊसाहेब जगताप, कांतीलाल लोंढे, प्रा. अशोक पवार आदींनी संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. समेलनाचे प्रास्ताविक संयोजक तानाजी डाडर यांनी तर आभार चंद्रकांत नेटके यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.मनमोहनदास खुडे व प्रा. विक्रम कांबळे यांनी केले.

COMMENTS