Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतुळ येथे निवासी बाल सुसंस्कार शिबीर

अकोले : तालुक्यातील कोतुळ येथील कोतुळेश्वर देवस्थानात कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आध्यात्मिक व्यक्तिमत्व विकासासाठी भव्य निवासी बाल

वीजमीटरचे १०० टक्के अचूक रीडिंग घ्या; अन्यथा कठोर कारवाई अटळ
महिलेची छेड काढणार्‍यास सक्तमजुरी व दंडाची शिक्षा
जामखेडमध्ये जुन्या भांडणातून कोयत्याने वार

अकोले : तालुक्यातील कोतुळ येथील कोतुळेश्वर देवस्थानात कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आध्यात्मिक व्यक्तिमत्व विकासासाठी भव्य निवासी बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर गुरुवार (दि. २३ एप्रिल)  पासून सुरू होऊन शनिवार (दि. २ मे) रोजी संपन्न होणार आहे. या शिबिराला समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर), विदर्भरत्न ह.भ.प. संजय महाराज पाचपोर, ह.भ.प. गुरुवर्य रामनाथ महाराज जाधव, ह.भ.प. विवेक महाराज केदार तसेच ह.भ.प. दिपक महाराज देशमुख यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिबिरासाठी नाममात्र ७०० रुपये प्रवेश फी निश्चित करण्यात आली आहे. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी योगासन, व्यायाम, प्रार्थना, गीतापाठ, गायन, मृदुंग मार्गदर्शन, हनुमान चालीसा, श्रीमद् भगवद्गीता, संस्कृत श्लोक, सुभाषित पाठांतर, हरिपाठ तसेच सुसंस्कारविषयक मार्गदर्शन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक ह.भ.प. दत्तात्रय महाराज भोर, ह.भ.प. नितीन महाराज गोडसे व आचार्य ह.भ.प. प्रसाद महाराज भोर यांनी केले आहे.

COMMENTS