SIT ची मोठी कारवाई! अशोक खरातच्या लॅपटॉपमधून धक्कादायक डेटा रिकव्हर; १६ फोल्डर्सनी खरातच्या अडचणी वाढवल्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

SIT ची मोठी कारवाई! अशोक खरातच्या लॅपटॉपमधून धक्कादायक डेटा रिकव्हर; १६ फोल्डर्सनी खरातच्या अडचणी वाढवल्या.

मुंबई : आध्यात्मिक शक्ती आणि दैवी चमत्काराचा बनाव रचून अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या तसेच शेकडो भक्तांना लुबाडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या

संगमनेरच्या दत्तधाम आश्रमची मोठी उपडेट; पोलिसांना दत्तधाम मधून औषधांचा साठा आणि २०० व्हिडिओस् जप्त
भोंदू बाबाच्या जाळ्यात ‘हाय-प्रोफाईल’ भक्त?; गणेश शिंदेच्या अटकेनंतर राहुरीतील भक्त संपर्क क्षेत्राच्या बाहेर
बागेश्वर धामातील गवई!
The current image has no alternative text. The file name is: Doshi-69.jpg

मुंबई : आध्यात्मिक शक्ती आणि दैवी चमत्काराचा बनाव रचून अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या तसेच शेकडो भक्तांना लुबाडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या आता आणखी अडचणीत वाढ झाली आहे. सध्या अशोक खरात हा पोलीस कोठडीत आहेत.
अशोक खरात केवळ शोषणावरच थांबला नाही, तर त्याने भक्तांची आर्थिक लूट करण्यासाठीही मोठे जाळे विणले होते. या तपासात आता महेश कलंत्री या नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. तपासात समोर आले आहे की, कलंत्री हा खरातला बनावट आणि स्वस्त खडे पुरवत असे. खरात हेच खडे सिद्ध केलेले असल्याचे सांगून भक्तांना लाखो रुपयांना विकत असे.
महेश कलंत्रीने हे खडे कुठून मिळवले, या नफ्यातील वाटा कोणाकोणाला जात होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. कलंत्रीच्या अटकेनंतर या रॅकेटमधील आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) अशोक खरातच्या गुन्ह्यांचे धागेदोरे शोधून काढले आहेत. छापेमारीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या डिजीटल उपकरणांमधून खरातचे धक्कादायक सत्य बाहेर आले आहे. पोलीसांसह एसआयटीकडून त्याचा बंगला, ऑफिससह विविध ठिकाणी तपासणी केली जात आहे. अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील मुख्य कार्यालयावर छापा टाकून लॅपटॉप, दोन पेन ड्राईव्ह आणि ६४ GB क्षमतेचे ओटीजी (OTG) डिव्हाईस जप्त केले आहेत. या उपकरणांच्या फॉरेन्सिक तपासणीतून तब्बल १६० GB डेटा रिकव्हर करण्यात आला आहे. यातील प्रत्येक पुराव्याला A, B, C कोडवर्ड असे कोडवर्ड पाहायला मिळत आहे. यातील ‘A’ असा कोडवर्ड असलेल्या फोल्डरमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचे आणि अत्याचाराचे स्पष्ट संकेत देणारे व्हिडिओ व चॅट्स सापडले आहेत. हा सर्व डेटा नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या काळातील आहे. यामध्ये अशोक खरातने केलेल्या अनेक संशयास्पद व्यवहारांचा आणि संवादांचा समावेश आहे.
दरम्यान नाशिकच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीने आता तांत्रिक पुराव्यांसोबतच साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. अशोक खरातच्या कार्यालयातून जप्त केलेले १६ फोल्डर त्याच्या विरोधात न्यायालयात भक्कम पुरावा ठरणार आहेत.

COMMENTS