अहिल्यानगर : राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. राज्याचं लक्ष ला


अहिल्यानगर : राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. राज्याचं लक्ष लागेलल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने अखेरच्या क्षणी माघार घेतली. दुसरीकडे राहुरी मतदारसंघातही आज शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपली माघार घेतली असून 7 उमेदवार रिंगणात कायम आहेत. त्यामुळे, कोण होणार राहुरीचा आमदार याची उत्सुकता आता मतदारसंघात वाढली आहे.
राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विधानसभा पोटनिवडणूक होत भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रामुख्याने या दोन पक्षातच थेट लढत होत असली तरीही, वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून संतोष चोळके उमेदवार आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे हेही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहेत. मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे हेही निवडणुकीच्या मैदानात चर्चेत होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गोविंद मोकाटे यांना तिकीट मिळालं. त्यातच, आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अखेरचे 7 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
आता राहुरीत 7 उमेदवार निवडणुकीत कायम
अक्षय कर्डीले (भाजप महायुती), गोविंद मोकाटे( राष्ट्रवादी शरदचंद्र पवार), संतोष चोळके (वंचित बहुजन आघाडी), अथर्व म्हसे (अपक्ष), रावसाहेब खेवरे (अपक्ष), सूर्यभान लांबे (अपक्ष), महेश हापसे (अपक्ष),

COMMENTS