Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहिसर-मीरा भाईंदर मेट्रो 9 ला हिरवा झेंडा; ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यालाही प्रारंभ

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या

मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू : नगराध्यक्ष आव्हाड
माफिया अन् मच्छर दोघांचाही खात्मा : योगी आदित्यनाथ  
पुणे-संभाजीनगरसह मुंबई बंगळुरू महामार्गाला मंजुरीकेंद्रीय मंत्री गडकरी यांची माहिती ; प्रवास होणार वेगवान

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला अखेर हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेवांचे लोकार्पण झाले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचेही भूमिपूजन करण्यात आले.
दहिसर पूर्व ते काशीगाव असा सुमारे 4.4 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाल्याने मीरा-भाईंदर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गिकेमुळे मेट्रो 7 शी थेट जोडणी निर्माण झाली असून उपनगरांमधील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. यासोबतच अंधेरी पश्‍चिम ते मंडाले या मेट्रो 2 ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले हा टप्पाही प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकल्पाची सुरुवात काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती आणि आता पहिला टप्पा पूर्णत्वास आला आहे. दुसर्‍या टप्प्यातील साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान हा भाग जवळपास पूर्ण झाला असून त्याचे उद्घाटनही लवकरच करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित असून प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पूर्वी दोन तास लागणारा प्रवास आता अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला. त्यामुळे रोजच्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

COMMENTS