Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोळसा तस्करी प्रकरणी ईडीची छापेमारी; तृणमूलचे निवडणूक रणनीती ठरवणारी कंपनी आय-पॅक रडारवर

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने कोळसा तस्करी प्रकरणात गुरुवारी तृणमूल काँगे्रसची राजकीय सल्लागार संस्था आय-पॅकवर मोठी कारवाई करत द

छुप्या परिसीमनवर सरकार-विरोधक खडाजंगी !
लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक
ऑपरेशन लोटस की केजरीवालांची मनमानी?

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने कोळसा तस्करी प्रकरणात गुरुवारी तृणमूल काँगे्रसची राजकीय सल्लागार संस्था आय-पॅकवर मोठी कारवाई करत देशातील विविध ठिकाणी छापेमारी केली. दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद येथील कार्यालयांवर एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आय-पॅक ही संस्था पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षासाठी निवडणूक रणनीती आणि व्यवस्थापनाचे काम पाहत असल्याने या कारवाईकडे विशेष लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा संबंध कथित कोळसा चोरी घोटाळ्याशी जोडला जात आहे. या घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा संशय असून मनी लॉन्ड्रिंगचे गंभीर आरोप समोर आले आहेत. केंद्रीय अन्वेषण संस्थेने यासंदर्भात नोव्हेंबर 2020 मध्ये गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर ईडीनेही तपास सुरू करून आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेतला. तपासादरम्यान काही रक्कम हवालामार्गे आय-पॅकपर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या व्यवहारांमुळे कंपनीच्या आर्थिक हालचालींची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. आय-पॅकचे संचालक प्रतीक जैन यांच्याशी संबंधित ठिकाणांवरही यापूर्वी छापेमारी करण्यात आली होती. कोलकात्यातील त्यांच्या निवासस्थान आणि कार्यालयात ईडीच्या पथकाने शोधमोहीम राबवली होती. त्या वेळी अनेक कागदपत्रे आणि डिजिटल माहिती जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. जानेवारी महिन्यात झालेल्या कारवाईदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः संबंधित ठिकाणी पोहोचल्या होत्या. त्यांनी या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर राजकीय दबाव टाकण्याचा आरोप केला होता. त्यांच्या मते, तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केला जात आहे.

COMMENTS