Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनोद अहिरे यांचे कार्य समाजाभिमुख : बिपीन कोल्हे

कोपरगाव : तालुक्यातील धामोरी येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद अहिरे यांनी त्यांचे वडील कै. मारुती अहिरे यांच्या स्मरणार्थ भैरवनाथ देवस्थान ट्रस्टला

गोदावरी संवर्धनासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय;नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन; कोपरगावात २० कोटींच्या कामांना गती
पाणी वापर संस्थेचे चेअरमन, सचिवांचा राजीनामा;‘श्री संत शेख महंमद महाराज’ संस्थेत घडामोड; कामकाजावर परिणामाची शक्यता
जम्प रोप राष्ट्रीय स्पर्धेत पार्थ भिंगारेला सुवर्णपदक

कोपरगाव : तालुक्यातील धामोरी येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद अहिरे यांनी त्यांचे वडील कै. मारुती अहिरे यांच्या स्मरणार्थ भैरवनाथ देवस्थान ट्रस्टला (धामोरी) सुसज्ज अद्यावत रुग्णवाहिका भेट दिली.  याबद्दल त्यांचा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विनोद अहिरे यांचे कार्य समाजाभिमुख असल्याचे यावेळी कोल्हे म्हणाले.

प्रारंभी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी प्रास्तविक केले. बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, समाजाचं आपण देणं लागत असतो. रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा आहे. कोरोना महामारीत आपण सर्वांनी अनुभवलं. रूग्णांना तात्काळ आरोग्यसुविधा मिळाव्या यासाठी रूग्णवाहिकेची नेहमीच गरज भासते. विनोद अहिरे यांनी नेमकेपणांने ग्रामिण भागात ही सुविधा उपलब्ध करून देत समाजाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संपूर्ण कोपरगांव विधानसभा मतदार संघात संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने फिरता दवाखाना मोबाईल व्हॅन थेट रूग्णांच्या दारापर्यंत उपलब्ध करून देत त्यातुन समाजकार्य साधण्याचा प्रयत्न केला आहे असेही बिपीन कोल्हे शेवटी म्हणाले. याप्रसंगी संचालक विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, विलासराव माळी, राहुल वाणी आदि उपस्थित होते. संचालक विलासराव माळी यांनी आभार मानले.

COMMENTS