Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृष्णानंद महाराज यांचे कार्य देवस्वरूपी ः मेजर सैंदोरे

श्रीरामपूर ः श्रीरामपूर परिसरातील गोखलेवाडी येथील श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष ह.भ.प.कृष्णानंद महाराज यांनी अनेक अनाथ, निराधार

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण? | LOKNews24
डोक्यात दांडा मारून एकाचा खून
अहमदनगर जिल्ह्यात दोन कोटींची वीज चोरी पकडली

श्रीरामपूर ः श्रीरामपूर परिसरातील गोखलेवाडी येथील श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष ह.भ.प.कृष्णानंद महाराज यांनी अनेक अनाथ, निराधार, दुःखी आणि मरण यातना भोगणार्‍या मुलं, मुलींना नवे जीवन दिले, त्यांचे संगोपन करून शिक्षण देत आहेत ह त्यांचे  कार्य देवस्वरूपी असल्याचे मत भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झालेले मेजर नंदकुमार सैंदोरे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष सौ. मंदाकिनी बाबुराव उपाध्ये यांनी रोख एकवीसशे व अनेक भेटवस्तू दिल्या तसेच  नितीन प्रभाकर जोर्वेकर आणि माधुरी जोर्वेकर यांनी आपल्या कार्तिक मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आश्रमातील सर्वांना भोजन व जीवनावश्यक वस्तू दिल्या. देणगी देण्याचा कार्यक्रम झाला, त्याप्रसंगी मेजर नंदकुमार सैंदोरे बोलत होते. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. महेश सोमवंशी यांनी कृष्णानंद महाराज यांचा सत्कार केला तर महाराजांनी नितीन जोर्वेकरसह सर्वांचा सत्कार केले.मेजर नंदकुमार सैंदोरे म्हणाले, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबा आमटे इत्यादी समाजसेवकांनी दुर्लक्षित, निराधार, दीनदुबळ्यांसाठी समाजकार्य हाती घेतले आणि तेच लोकमनातले देव झाले. तसेच कार्य श्रीरामपूरसारख्या दुर्लक्षित भागात ह कार्य कृष्णानंद महाराज करीत आहेत, ते गौरवस्पद आहे, त्यांच्या या कार्याला मदत करणे आपले कर्तव्य आहे. यावेळी श्रीमती सुमनताई मांढरे, कविता गणेश वाडेकर, रेणुका महेश सोमवंशी, श्रद्धा चेतन तुळे, कृष्णा रवींद्र सैंदोरे, प्रथमेश नितीन जोर्वेकर, कु. आराध्या नंदकुमार सैंदोरे आदी उपस्थित होते. कृष्णानंद महाराज यांनी आश्रमात आलेल्या प्रत्येक मुलांमुलींची जीवनव्यथा सांगून आपणच अनाथ असल्यामुळे कार्य हाती घेतले आहे. वयाच्या 15 व्या वर्षांपासून ह काम हाती घेतले, आता 20 वर्ष वय झाले आहे आणि 24 अनाथांचे देवालय बांधले आहे. असे सांगून उपाध्ये परिवार, जोर्वेकर परिवार, वाडेकर परिवार, तुळे परिवार, सैंदोरे परिवार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

COMMENTS