Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल परिसरात सुरक्षा दलांनी राबवलेल्या संयुक्त कारवाईत एका अतिरेक्याचा बुधवारी सकाळी खात्मा करण्यात आला. मंगळवारी

गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्याची देशभरात चर्चा
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट
‘मविआ’ची जागा वाटपात ‘आघाडी’ !

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल परिसरात सुरक्षा दलांनी राबवलेल्या संयुक्त कारवाईत एका अतिरेक्याचा बुधवारी सकाळी खात्मा करण्यात आला. मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेली ही मोहीम गुप्तचर माहितीच्या आधारे उभारण्यात आली होती. संबंधित भागात अजून एक अतिरेकी लपून बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, शोधमोहीम अद्याप सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिस आणि लष्कराच्या पथकाला गांदरबल परिसरात अतिरेकी हालचालींची ठोस माहिती मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी संपूर्ण परिसराची घेराबंदी करून शोधमोहीम सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती; मात्र अंधार आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे ती तात्पुरती स्थगित करण्यात आली. बुधवारी पहाटे पुन्हा मोहीम हाती घेतल्यानंतर चकमकीत एका अतिरेक्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले. दरम्यान, परिसरात आणखी एक अतिरेकी लपून बसल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सुरक्षा दलांनी सतर्कता वाढवली आहे. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेत परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यापूर्वीही जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी अतिरेक्यांविरोधात प्रभावी कारवाया केल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात विविध भागांत झालेल्या चकमकींमध्ये सहा अतिरेकी ठार करण्यात आले होते.

COMMENTS