कोपरगाव शहर : समता पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ अखेर ठेवींमध्ये उल्लेखनीय वाढ नोंदवत ११०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून एकूण ठेवी ११३० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. दि. ३० मार्च २०२६ रोजी आर्थिक पत्रके जाहीर करताना ही माहिती संचालक संदीप कोयटे यांनी दिली. गत आर्थिक वर्षाअखेरीस संस्थेने १००० कोटींचा टप्पा पार केला होता. यावर्षीही ३१ मार्चला शासकीय सुट्टी असल्याने ३० मार्च रोजी आर्थिक पत्रके जाहीर करण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली. लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत ९९.९४ टक्के ठेवीदारांच्या ६० लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्थेने सहकार खात्याच्या निकषांनुसार आवश्यक २५ टक्क्यांच्या तुलनेत २७.५२ टक्के म्हणजेच ३११ कोटी रुपयांची तरलता राखली आहे. तसेच आवश्यक १ टक्क्यांच्या तुलनेत ११ कोटी ७२ लाख रुपयांची रोख तरलता ठेवण्यात आली आहे. समता पतसंस्थेचे एकूण कर्जवाटप ८२५ कोटी रुपये असून संमिश्र व्यवसाय २ हजार कोटींकडे वाटचाल करीत आहे. संस्थेच्या नफ्यातही वाढ झाली असून तो ८ कोटी २५ लाख रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. ११ मे १९८६ रोजी स्थापन झालेल्या संस्थेला यावर्षी ४० वर्ष पूर्ण होत असून सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. तसेच ४० वर्ष सातत्याने सभासद असलेल्या सदस्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष अरविंदभाई पटेल व ज्येष्ठ संचालक जितुभाई शहा यांनी दिली. संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश (काका) कोयटे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची प्रगती सुरूच राहील, असा विश्वास महिला संचालिका श्वेता अजमेरा व अक्षरा पटेल यांनी व्यक्त केला. तर तरुण संचालकांना संधी दिल्यामुळे संस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होत असल्याचे संचालक निरव रावलिया, दीपक अग्रवाल व गिरीष सोनेकर यांनी सांगितले. थकबाकी वसुलीतही संस्थेने विक्रम केला असून अत्यल्प थकबाकी राखण्यात यश मिळाल्याचे वसुली विभाग प्रमुख जनार्दन कदम यांनी सांगितले. कोपरगाव शाखेच्या ठेवी ४०० कोटी, श्रीरामपूर ११० कोटी, राहाता १२५ कोटी, येवला ६० कोटी तर शिर्डी शाखेच्या ठेवी ५५ कोटी रुपयांच्या पुढे पोहोचल्या आहेत. सध्या संस्थेच्या २७ शाखा कार्यरत असून पुढील वर्षात ४० शाखांपर्यंत विस्ताराचा संकल्प आहे. चौकट : सोने तारण कर्जात १०० टक्के वसुली समता पतसंस्थेचे सोने तारण कर्ज सुमारे ६०० कोटी रुपयांचे असून या कर्जात १०० टक्के वसुली झाली आहे. ‘सुधन गोल्ड लोन’ योजनेअंतर्गत या कर्जावर शून्य टक्के थकबाकी (एनपीए) राखण्यात संस्थेला यश आले आहे. एकूण कर्जवाटपापैकी ७३ टक्के कर्ज सोने तारणावर आधारित असून यामुळे ठेवींची सुरक्षितता अधिक बळकट झाल्याची माहिती सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी दिली.

कोपरगाव शहर : समता पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ अखेर ठेवींमध्ये उल्लेखनीय वाढ नोंदवत ११०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून एकूण ठेवी ११३० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. दि. ३० मार्च २०२६ रोजी आर्थिक पत्रके जाहीर करताना ही माहिती संचालक संदीप कोयटे यांनी दिली.
गत आर्थिक वर्षाअखेरीस संस्थेने १००० कोटींचा टप्पा पार केला होता. यावर्षीही ३१ मार्चला शासकीय सुट्टी असल्याने ३० मार्च रोजी आर्थिक पत्रके जाहीर करण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली. लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत ९९.९४ टक्के ठेवीदारांच्या ६० लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
संस्थेने सहकार खात्याच्या निकषांनुसार आवश्यक २५ टक्क्यांच्या तुलनेत २७.५२ टक्के म्हणजेच ३११ कोटी रुपयांची तरलता राखली आहे. तसेच आवश्यक १ टक्क्यांच्या तुलनेत ११ कोटी ७२ लाख रुपयांची रोख तरलता ठेवण्यात आली आहे. समता पतसंस्थेचे एकूण कर्जवाटप ८२५ कोटी रुपये असून संमिश्र व्यवसाय २ हजार कोटींकडे वाटचाल करीत आहे.
संस्थेच्या नफ्यातही वाढ झाली असून तो ८ कोटी २५ लाख रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. ११ मे १९८६ रोजी स्थापन झालेल्या संस्थेला यावर्षी ४० वर्ष पूर्ण होत असून सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. तसेच ४० वर्ष सातत्याने सभासद असलेल्या सदस्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष अरविंदभाई पटेल व ज्येष्ठ संचालक जितुभाई शहा यांनी दिली.
संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश (काका) कोयटे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची प्रगती सुरूच राहील, असा विश्वास महिला संचालिका श्वेता अजमेरा व अक्षरा पटेल यांनी व्यक्त केला. तर तरुण संचालकांना संधी दिल्यामुळे संस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होत असल्याचे संचालक निरव रावलिया, दीपक अग्रवाल व गिरीष सोनेकर यांनी सांगितले.
थकबाकी वसुलीतही संस्थेने विक्रम केला असून अत्यल्प थकबाकी राखण्यात यश मिळाल्याचे वसुली विभाग प्रमुख जनार्दन कदम यांनी सांगितले. कोपरगाव शाखेच्या ठेवी ४०० कोटी, श्रीरामपूर ११० कोटी, राहाता १२५ कोटी, येवला ६० कोटी तर शिर्डी शाखेच्या ठेवी ५५ कोटी रुपयांच्या पुढे पोहोचल्या आहेत. सध्या संस्थेच्या २७ शाखा कार्यरत असून पुढील वर्षात ४० शाखांपर्यंत विस्ताराचा संकल्प आहे.
चौकट : सोने तारण कर्जात १०० टक्के वसुली
समता पतसंस्थेचे सोने तारण कर्ज सुमारे ६०० कोटी रुपयांचे असून या कर्जात १०० टक्के वसुली झाली आहे. ‘सुधन गोल्ड लोन’ योजनेअंतर्गत या कर्जावर शून्य टक्के थकबाकी (एनपीए) राखण्यात संस्थेला यश आले आहे. एकूण कर्जवाटपापैकी ७३ टक्के कर्ज सोने तारणावर आधारित असून यामुळे ठेवींची सुरक्षितता अधिक बळकट झाल्याची माहिती सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी दिली.

COMMENTS