Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्व. बाबुजी आव्हाड यांचे पाथर्डीच्या विकासात मोठे योगदान;आ. मोनिका राजळे ; १०५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

पाथर्डी : तालुक्याच्या शिक्षण,आरोग्य, सामाजिक तसेच राजकीय जडणघडणीमध्ये पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार व थोर स्वातंत्र्यसेनानी स्व.बाबुजी आव्हाड यांचे खूप मोठे योगदान होते. बाबुजींनी दूरदृष्टी ठेऊन पाथर्डी तालुक्याच्या सहकार व समाजकारण यामध्ये अमुलाग्र बदल घडवला असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. त्या येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात स्व. बाबुजी आव्हाड यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या. यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष एड सुरेशराव आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगलताई कोकाटे, विश्वस्थ नंदुशेठ शेळके, सचिव दिलीपराव गर्जे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, महेंद्र शिरसाठ, प्राचार्य डॉ. बबन चौरे, माजी प्राचार्य डॉ जी.पी. ढाकणे, विवेकानंद विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शरद मेढे, अनुजा कुलकर्णी, कॉम्रेड रामभाऊ दातीर, ऍड.दिनकरराव पालवे, शिवाजी महाराज वारे उपस्थित होते. मोनिका राजळे पुढे म्हणाल्या, बाबुजींनी पाथर्डीच्या २५ एकर माळरानावर उसतोडणी कामगारांच्या मुलांना उच्चशिक्षण मिळावे हा उदात्त हेतू ठेऊन पार्थ विद्या प्रसारक मंडळाअंतर्गत सन १९६६ मध्ये जनता महाविद्यालयाची स्थापना केली. बाबूजींनी त्यांचे समकालीन सहकारी स्व. दादापाटील राजळे, मा आमदार रावसाहेब म्हस्के, रामभाऊ अकोलकर यांच्याबरोबर काम करून पाथर्डी तालुक्याला सहकारक्षेत्रात वेगळी दिशा देण्याचे काम केले. बाबूजींनी स्थापन केलेल्या पार्थ विद्या प्रसारक मंडळाचा यशस्वी वारसा पुढे सुरु ठेवण्याचे काम अभय आव्हाड करत असून ही संस्था एक आगळीवेगळी संस्था म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात नावारुपास आली आहे. बाबूजींना वाचनाची खूप आवड होती.त्यांचे ग्रंथालयावर विशेष प्रेम होते. सामान्य व्यक्ती आपल्या सभोवतालचा विचार करते परंतु असामान्य व्यक्ती नेहमी दुरदृष्टीचा विचार करतात. हे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे बाबूजी होत, असे त्या शेवटी म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ बबन चौरे, सूत्रसंचालन प्रा शेखर ससाणे तर आभार प्रा. शरद मेढे यांनी मानले.

‘समर्थ क्रॉप केअर’कडून कोट्यवधींची फसवणूक; वाढीव व्याजाचे आमिष; एजंट-गुंतवणूकदार हाणामारीनंतर प्रकार समोर
रस्ता काँक्रिटीकरणाची मागणी;नगरसेविका दीपाली बंग यांचे निवेदन; सत्याग्रहाचा इशारा
कंटेनरची तीन घरांना धडक; माणिकदौण्डी परिसरातील घटना ; जीवितहानी नाही

पाथर्डी : तालुक्याच्या शिक्षण,आरोग्य, सामाजिक तसेच राजकीय जडणघडणीमध्ये पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार व थोर स्वातंत्र्यसेनानी स्व.बाबुजी आव्हाड यांचे खूप मोठे योगदान होते. बाबुजींनी दूरदृष्टी ठेऊन पाथर्डी तालुक्याच्या सहकार व समाजकारण यामध्ये अमुलाग्र बदल घडवला असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

त्या येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात स्व. बाबुजी आव्हाड यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या. यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष एड सुरेशराव आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगलताई कोकाटे, विश्वस्थ नंदुशेठ शेळके, सचिव दिलीपराव गर्जे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, महेंद्र शिरसाठ, प्राचार्य डॉ. बबन चौरे, माजी प्राचार्य डॉ जी.पी. ढाकणे, विवेकानंद विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शरद मेढे, अनुजा कुलकर्णी, कॉम्रेड रामभाऊ दातीर, ऍड.दिनकरराव पालवे, शिवाजी महाराज वारे उपस्थित होते.

मोनिका राजळे पुढे म्हणाल्या, बाबुजींनी पाथर्डीच्या २५ एकर माळरानावर उसतोडणी कामगारांच्या मुलांना उच्चशिक्षण मिळावे हा उदात्त हेतू ठेऊन पार्थ विद्या प्रसारक मंडळाअंतर्गत सन १९६६ मध्ये जनता महाविद्यालयाची स्थापना केली. बाबूजींनी त्यांचे समकालीन सहकारी स्व. दादापाटील राजळे, मा आमदार रावसाहेब म्हस्के, रामभाऊ अकोलकर यांच्याबरोबर काम करून पाथर्डी तालुक्याला सहकारक्षेत्रात वेगळी दिशा देण्याचे काम केले. बाबूजींनी स्थापन केलेल्या पार्थ विद्या प्रसारक मंडळाचा यशस्वी वारसा पुढे सुरु ठेवण्याचे काम अभय आव्हाड करत असून ही संस्था एक आगळीवेगळी संस्था म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात नावारुपास आली आहे. बाबूजींना वाचनाची खूप आवड होती.त्यांचे ग्रंथालयावर विशेष प्रेम होते. सामान्य व्यक्ती आपल्या सभोवतालचा विचार करते परंतु असामान्य व्यक्ती नेहमी दुरदृष्टीचा विचार करतात. हे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे बाबूजी होत, असे त्या शेवटी म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ बबन चौरे, सूत्रसंचालन प्रा शेखर ससाणे तर आभार प्रा. शरद मेढे यांनी मानले.

COMMENTS