Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुकडी डावा कालवा नूतनीकरणासाठी 47 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता

अहिल्यानगर : अहिल्यानगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील कुकडी डावा कालव्याच्या किलोमीटर 165 ते 249 मधील वितरण व्यवस्थेच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र

मुंबई व नवी मुंबई विमानतळ जोडणारी नवी मेट्रो
शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक : मुख्यमंत्री फडणवीस; नागपुरात ‘महाराष्ट्र ज्ञान सभा-2026’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात

अहिल्यानगर : अहिल्यानगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील कुकडी डावा कालव्याच्या किलोमीटर 165 ते 249 मधील वितरण व्यवस्थेच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने 47 कोटी 3 लाख 52 हजार 400 रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मान्यतेने व मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, या प्रशासकीय मान्यतेसाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. 27 मार्च 2026 रोजी यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या या मुख्य कालव्याचे बांधकाम सुमारे तीस वर्षांपूर्वी झाले असून, यातील काही भागाचे अस्तरीकरण बारा ते पंधरा वर्षांपूर्वी करण्यात आले होते. गेल्या पंचवीस वर्षांपासून या कालव्यातून सातत्याने सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. मात्र, अस्तरीकरण सलग नसल्यामुळे कालव्याची मोठी झीज झाली असून, राडारोडा व झाडेझुडुपे वाढल्याने तसेच जुनी बांधकामे नादुरुस्त झाल्याने पाणी वाहून नेण्यात मोठे अडथळे येत होते. यामुळे पाण्याची गळती होऊन मोठा अपव्यय होत होता व शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब लागत होता. कालव्याच्या या दुरवस्थेवर मात करण्यासाठी व पाण्याचा अपव्यय टाळून सिंचन कालावधी कमी करण्यासाठी शासनाच्या ’विशेष दुरुस्ती’ अंतर्गत ही कामे हाती घेण्यात आली आहेत.

COMMENTS