Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्त्याच्या कामास निधी वाढवून मिळावा : गगन हाडा

कोपरगाव शहर : प्रभाग क्रमांक १५ मधील छोट्या पुलापासून मोहनीराज नगरपर्यंतच्या रस्त्यासाठी मंजूर निधी अपुरा पडत असल्याने अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शहरप्रमुख गगन हाडा यांनी केली आहे. सदर रस्त्यासाठी २०२३ मध्ये सुमारे ४० लाख रुपयांच्या आसपास निधी मंजूर झाला होता. मात्र, जवळपास तीन वर्षांनंतर म्हणजे २०२६ मध्ये या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मंजूर निधी अपुरा असल्याने अतिरिक्त निधी द्यावा, अशी मागणी होत असून रामनवमीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी तात्पुरत्या कामावरच समाधान मानावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शहरप्रमुख पै. गगन हाडा यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देत या कामात भ्रष्टाचार होण्याची शक्यता व्यक्त करत तसेच दर्जेदार काम करण्याचे आव्हानही निवेदनाद्वारे दिले असून  सदर निवेदन देतेप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या प्रकरणावर नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेणार आणि रस्त्याचे काम पारदर्शकपणे पूर्ण होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

समाजसेवक देडगांवकरांचा ४६ वर्षांच्या समाजसेवेबद्दल सन्मान  
शेवगावात पाण्याअभावी पिके जळण्याच्या मार्गावर ‘ताजनापूर’चे पाणी माळेगाव-ने व ठाकूर निमगावच्या तलावात सोडण्याची मागणी
संगमनेर येथील अ‍ॅसिड हल्ल्याचे विधानसभेत उमटले पडसाद; आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची 10 विशेष पथके तैनात

कोपरगाव शहर : प्रभाग क्रमांक १५ मधील छोट्या पुलापासून मोहनीराज नगरपर्यंतच्या रस्त्यासाठी मंजूर निधी अपुरा पडत असल्याने अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शहरप्रमुख गगन हाडा यांनी केली आहे.

सदर रस्त्यासाठी २०२३ मध्ये सुमारे ४० लाख रुपयांच्या आसपास निधी मंजूर झाला होता. मात्र, जवळपास तीन वर्षांनंतर म्हणजे २०२६ मध्ये या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मंजूर निधी अपुरा असल्याने अतिरिक्त निधी द्यावा, अशी मागणी होत असून रामनवमीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी तात्पुरत्या कामावरच समाधान मानावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

याच पार्श्वभूमीवर, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शहरप्रमुख पै. गगन हाडा यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देत या कामात भ्रष्टाचार होण्याची शक्यता व्यक्त करत तसेच दर्जेदार काम करण्याचे आव्हानही निवेदनाद्वारे दिले असून  सदर निवेदन देतेप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या प्रकरणावर नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेणार आणि रस्त्याचे काम पारदर्शकपणे पूर्ण होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS