कामगारांच्या आरोग्य संवर्धनावर भर कोपरगाव : संजीवनी युवा प्रतिष्ठान, आरोग्य साथी फाउंडेशन व आत्मा मलिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने माज

कामगारांच्या आरोग्य संवर्धनावर भर
कोपरगाव : संजीवनी युवा प्रतिष्ठान, आरोग्य साथी फाउंडेशन व आत्मा मलिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मंत्री तथा सहकार महर्षी स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त ‘प्रेरणा दिना’चे औचित्य साधून औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांसाठी मोफत टीबी (क्षयरोग) तपासणी व सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक सभागृह, औद्योगिक वसाहत येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते झाले.
यावेळी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना बिपीनदादा कोल्हे म्हणाले, औद्योगिक वसाहतीतील कामगारांचे आरोग्य सुदृढ राहणे हेच समाजाच्या प्रगतीचे बळ आहे. धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. अशा आरोग्य शिबिरांमुळे वेळेत आजारांचे निदान होऊन योग्य उपचार मिळण्यास मदत होते. त्यामुळे कामगारांची कार्यक्षमता वाढून निरोगी समाज घडण्यास हातभार लागतो.
स्व. कोल्हे यांनी दूरदृष्टीने औद्योगिक वसाहतीची स्थापना करून स्थानिक उद्योजकांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या या कार्यामुळे कोपरगावसह परिसरातील उद्योगांना चालना मिळाली असून त्यांचे स्वप्न साकार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक वसाहतीत अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान, व्हा. चेअरमन केशवराव भवर, संचालक मनोजशेठ अग्रवाल, रोहित वाघ, सागर शहा, अभिजीत राहतेकर, जितेंद्रसिंग सारदा, पंडितराव भारुड, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, कारखानदार वसंतराव देशमुख, आरोग्य साथी फाउंडेशनचे चंदन यादव, ध्रुव खतियार, आत्मा मलिक हॉस्पिटलच्या श्रेया देवकर, कॅम्प इन्चार्ज संदीप दिवे, सुवर्णेश साबळे, अनिकेत गायकवाड आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते

COMMENTS