इराण संघर्षामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने : पंतप्रधान मोदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इराण संघर्षामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियामध्ये अमेरिका-इस्त्राईलचा इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यामुळे जगभरात काही देश सोडता इंधनटंचाई निर्माण झालेली आहे. याप्रकरण

युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का : पंतप्रधान मोदी; दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे, देशाच्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य
चार हजार एकर जमीन व्यवहारावर प्रश्नचिन्ह; खा. लंके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; व्यवहाराच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी
युद्धाच्या झळा आणि अर्थव्यवस्थेची कसोटी!
The current image has no alternative text. The file name is: 128936986.jpg

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियामध्ये अमेरिका-इस्त्राईलचा इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यामुळे जगभरात काही देश सोडता इंधनटंचाई निर्माण झालेली आहे. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत निवेदन करत सांगितले की, संपूर्ण जग, सर्व पक्षांना हे संकट लवकरात लवकर सोडवण्याचा आग्रह करत आहे. या संघर्षामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हानेही उभी राहिली आहेत. ही आव्हाने आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवतावादी आहेत. भारताची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, भारताची भूमिका स्पष्ट आहे; तणाव संपलाच पाहिजे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, संघर्षाने प्रभावित झालेल्या देशांशी भारताचे व्यापक व्यापारी संबंध आहेत. ज्या प्रदेशात संघर्ष सुरू आहे, तो जगभरातील इतर देशांसोबतच्या आपल्या व्यापारासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. विशेषतः हा प्रदेश आपल्या कच्च्या तेलाच्या आणि वायूच्या गरजांचा एक महत्त्वपूर्ण भाग पुरवतो. पश्‍चिम आशियात सुमारे एक कोटी भारतीय वास्तव्यास असल्याचे सांगताना पंतप्रधानांनी त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट केले. संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आतापर्यंत सुमारे 3 लाख 75 हजार भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात यश आले आहे. इराणमधूनही मोठ्या संख्येने भारतीय परतले असून त्यात वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा मोठा समावेश आहे. भारतीय दूतावासांमार्फत मदतकार्य सुरू असून चौवीस तास कार्यरत हेल्पलाइनद्वारे आवश्यक माहिती पुरवली जात आहे. ऊर्जा क्षेत्रावर बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, देशात इंधनटंचाई निर्माण होऊ नये यासाठी साठवण क्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे. सध्या सुमारे 6.5 दशलक्ष मेट्रिक टन इतकी साठवण क्षमता उभारण्याचे काम सुरू आहे. तेल, वायू आणि खतांची वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विविध देशांशी समन्वय साधला जात आहे. प्रत्येक संभाव्य स्रोताकडून पुरवठा अखंड सुरू राहील, याची खात्री करण्यावर सरकारचा भर आहे. उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर वाढत्या विजेच्या मागणीचा विचार करून वीज निर्मिती केंद्रांवर कोळशाचा पुरेसा साठा ठेवण्यात आला आहे. उत्पादनापासून वितरणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर काटेकोर देखरेख ठेवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.


शांततापूर्ण तोडग्याचे आवाहन
या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी भारताने सातत्याने राजनैतिक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. स्वतः पंतप्रधानांनी संबंधित देशांच्या नेत्यांशी संवाद साधून तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. सर्व पक्षांनी लवकरात लवकर शांततामय मार्ग स्वीकारावा, अशी भारताची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


अन्नसुरक्षा आणि शेती क्षेत्राला दिलासा
जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा ठेवण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अडचण भासू नये, यासाठी यंत्रणा सज्ज आहे.शेतकर्‍यांसाठी खतांचा पुरवठा स्वस्त दरात उपलब्ध राहावा यासाठी उपाययोजना केल्या असून देशांतर्गत उत्पादनालाही चालना दिली आहे. नॅनो युरियासारखे पर्याय उपलब्ध करून देत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS