राहाता : लोणी पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लोणी बुद्रुक, लोणी खुर्द तसेच कोल्हार बु. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी (दि. २१ मार्च) पार पडले. या उपक्रमांतर्गत लोणी गावातील २० चौकांमध्ये एकूण ८८ सीसीटीव्ही कॅमेरे, तर कोल्हार गावातील ८ चौकांमध्ये ३३ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. उद्घाटन सोहळा राज्याचे जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे (नाशिक परिक्षेत्र), पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (अहिल्यानगर) तसेच अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे (श्रीरामपूर) उपस्थित होते. या प्रकल्पामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणे शक्य होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास लोणी पोलीस स्टेशनचा कर्मचारीवर्ग तसेच लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, कोल्हार-भगवतीपूर, प्रवरानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहाता : लोणी पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लोणी बुद्रुक, लोणी खुर्द तसेच कोल्हार बु. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी (दि. २१ मार्च) पार पडले.
या उपक्रमांतर्गत लोणी गावातील २० चौकांमध्ये एकूण ८८ सीसीटीव्ही कॅमेरे, तर कोल्हार गावातील ८ चौकांमध्ये ३३ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
उद्घाटन सोहळा राज्याचे जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे (नाशिक परिक्षेत्र), पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (अहिल्यानगर) तसेच अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे (श्रीरामपूर) उपस्थित होते. या प्रकल्पामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणे शक्य होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास लोणी पोलीस स्टेशनचा कर्मचारीवर्ग तसेच लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, कोल्हार-भगवतीपूर, प्रवरानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS