Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामनवमी निमित्त श्रीगोंद्यात भव्य धार्मिक सोहळा

श्रीगोंदा : श्रीरामनवमी उत्सवानिमित्त श्रीगोंदा शहरात भव्य “ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह” तसेच श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक वातावरणात भक्तिभाव जागृत करणाऱ्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ह भ प नंदकुमार ताडे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार असून माजी आ. राहुल जगताप हे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा सप्ताह १९ मार्च २०२६ पासून सुरू होऊन २६ मार्च २०२६ रोजी श्रीराम जन्मोत्सवाने सांगता होणार आहे. कार्यक्रमादरम्यान दररोज पहाटे भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व रात्री हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार या सप्ताहात सहभागी होणार असून धार्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे. या सप्ताहात ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख (अंबाजोगाई) यांचे काल्याचे कीर्तन तसेच इतर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. सप्ताहाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कोपरगावात ‘नर्मदा प्रदक्षिणा स्वागत दिंडी’ जल्लोषात; विवेक कोल्हेंसह  हजारों भाविकांची उपस्थिती
एकलव्य आश्रमशाळेची राज्यस्तरीय हॅकॅथॉनसाठी निवड
अशोक खरात प्रकरणात मोठे खुलासे होणार : माजी खा.डॉ.सुजय विखे 

श्रीगोंदा : श्रीरामनवमी उत्सवानिमित्त श्रीगोंदा शहरात भव्य “ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह” तसेच श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक वातावरणात भक्तिभाव जागृत करणाऱ्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ह भ प नंदकुमार ताडे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार असून माजी आ. राहुल जगताप हे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा सप्ताह १९ मार्च २०२६ पासून सुरू होऊन २६ मार्च २०२६ रोजी श्रीराम जन्मोत्सवाने सांगता होणार आहे.

कार्यक्रमादरम्यान दररोज पहाटे भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व रात्री हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार या सप्ताहात सहभागी होणार असून धार्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे.

या सप्ताहात ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख (अंबाजोगाई) यांचे काल्याचे कीर्तन तसेच इतर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. सप्ताहाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

COMMENTS