Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे पोलिसांकडून 72 किलो गांजासह चार जण जेरबंद

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधातील मोहिम अधिक तीव्र करत लोणीकंद परिसरात मोठी कारवाई उभी केली. या कारवाईत तब्बल 72 किलो गांजा ज

रूपाली चाकणकरांनी नैतिकेच्या आधारावर पद सोडावे : खा. संजय राऊत
महिला दिनीचे भाषण चाकणकरांना भोवले !
कर्जत ‘राममय’; धार्मिक कार्यक्रमांनी शहर दुमदुमले

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधातील मोहिम अधिक तीव्र करत लोणीकंद परिसरात मोठी कारवाई उभी केली. या कारवाईत तब्बल 72 किलो गांजा जप्त करण्यात आला असून, चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 19 लाख 93 हजार 800 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक सातच्या पथकाला गस्तीदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. एका पांढर्‍या रंगाच्या मोटारीतून गांजा विक्रीसाठी आणला जात असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी केसनंद-वाडेबोल्हाई मार्गावर, बोल्हाईमाता मंदिराजवळ सापळा रचला. संशयित वाहन अडवून तपासणी केली असता, वाहनाच्या मागील भागात पोत्यांमध्ये लपवून ठेवलेला 58 किलोहून अधिक गांजा आढळून आला. चौकशीत आरोपींनी हा साठा पुण्यात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर मुख्य आरोपीच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील धायखिंडी येथील निवासस्थानी छापा टाकण्यात आला. तेथून आणखी 14 किलो गांजा हस्तगत करण्यात आला. यामुळे एकूण जप्ती 72 किलोपर्यंत पोहोचली. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शहरातील अंमली पदार्थांच्या जाळ्याचा माग काढण्यासाठी तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाली असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

COMMENTS