Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाजेगाव बंधार्‍यावर दुचाकीचा भीषण स्फोट; 90 टक्के भाजलेल्या युवकाचा जागीच मृत्यू, घातपाताचा संशय

नांदेड : ईद-उल-फित्रच्या पार्श्‍वभूमीवर नांदेड शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. वाजेगाव येथील गोदावरी नदीवरील बंधारा पुलावर धावत्या दुचाकीच

किनवट पोलिसांची मोठी कारवाई; 9 लाख 72 हजारांचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त
भूकंप होईल.. रोगराई वाढेल.. अतिवृष्टीसह पुराचा धोका; गोदड महाराज यांच्या संवत्सरीचे भाकीत; हजारो भाविकांची उपस्थिती
 रस्ता सुरक्षा अभियानात मिरजगावच्या विद्यार्थिनींचे यश


नांदेड : ईद-उल-फित्रच्या पार्श्‍वभूमीवर नांदेड शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. वाजेगाव येथील गोदावरी नदीवरील बंधारा पुलावर धावत्या दुचाकीचा अचानक स्फोट होऊन त्यावरील युवक गंभीररित्या जळाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून अपघात की घातपात याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ईदगाह मैदानावर नमाज अदा करून सकाळी सुमारे 9.25 वाजता एक युवक दुचाकीवरून खुदबई नगरकडून वाजेगावकडे जात होता. गोदावरी नदीवरील बंधार्‍याचा रस्ता पार करून चढावर पोहोचताच त्याच्या दुचाकीत अचानक स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की युवक खाली फेकला गेला. तो उठून सावरायच्या आतच गाडीने पेट घेतला आणि त्याच्या अंगालाही आग लागली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत चटईच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत युवक 90 टक्क्यांहून अधिक भाजला होता. तातडीने म्बुलन्स बोलावून त्याला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिली. घटनास्थळाजवळ झाडांच्या फांद्यांनाही आगीचा फटका बसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, स्फोट झालेल्या ठिकाणी काही संशयास्पद वस्तू आढळल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत अधिक वाढली आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ अपघात नसून घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा रंगत आहे.
दरम्यान, नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून विविध अंगांनी तपास सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तांत्रिक तपासासह घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात येत आहेत. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी प्राथमिक अंदाजानुसार पेट्रोल टाकीच्या स्फोटामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले असले, तरी अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. मृत युवकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून संबंधित दुचाकीचा क्रमांक एम एच -43- एए 9252 असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वाजेगावकडे लागले असून सत्य नेमके काय, याचा उलगडा तपासानंतरच होणार आहे.

COMMENTS