Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोले बाजार समितीच्या कोतुळ उपबाजार आवारात कांदा मार्केट सूरू शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

अकोले : अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोतूळ उप बाजार आवारात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कांदा मार्केटची सुरवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी या ठिकाणी सुरु झालेल्या कांदा मार्केटला  मोठा प्रतिसाद मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे यांचे हस्ते या कांदा लिलाव मार्केटचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उपसभापती रोहिदास भोर, संचालक ईश्वर वाकचौरे,राजेंद्र जगताप,मारुती वैद्य, किसन रंधे,मधुकर आहेर आदींसह शेतकरी, व्यापारी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी कोतुळ उपबाजार कांदा मार्केट यार्ड मध्ये कांद्याची मोठी आवक झाली. कांद्याला 950 ते 1250 रुपये भाव मिळाला. कांद्याचे व्यापारी नितीन भीमराज देशमुख, भाऊसाहेब बराते, गणेश पोखरकर, संतोष आरोटे,अमित कुऱ्हाडे, दिलीप  देशमुख, किशोर जाधव,  प्रसाद देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अमजद पठाण,शंकर घोलप ,संचित देशमुख या कांदा व्यापाऱ्यांनी लिलावात भाग घेतला. बांधावरील खरेदी पेक्षा मार्केट कमिटी आवारात खुल्या पद्धतीने लिलावाची बोली लावून विक्री झाली शेतकऱ्यांना जादा भाव मिळाला आणि कांद्याचे पैसेही लगेच मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन कोतुळ उपबाजार आवारात कांद्याचे लिलाव मार्केट सुरू केले आहे. या मार्केटमुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि लिलावानंतर लगेच कांद्याचे पैसेही मिळेल . शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कांदा माल या कोतुळ उपबाजार आवार या ठिकाणी विक्रीसाठी आणावा शासनाच्या विविध अनुदान योजनांचा यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. शिवार खरेदीत बाहेरील व्यापाऱ्यांकडून  फसवणूक होऊ नये यासाठी कोतूळ उप बाजार आवारात कांदा मार्केट सुरू केले आहे. येथे कांदा मार्केटला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. आठवड्यातील तीन दिवस सुरवातीला कांदा मार्केट सुरु राहील. त्यानंतर शेतकऱ्यांची मागणी वाढल्यास  कांदा  मार्केट  दररोज सुरू ठेऊ असे सभापती भानुदास तिकांडे यांनी यावेळी सांगितले. ओपन लिलाव पद्धतीने कांदा मार्केट सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला आता योग्य भाव मिळेल अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

खर्ड्यामध्ये कांद्याच्या पिकात अफूची शेती; दोघांविरोधात गुन्हा ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
नेहरू विद्यालयाला साऊंड सिस्टिम भेट
माहिती अधिकाराच्या माहितीप्रकरणी आंदोलनाचा इशारा

COMMENTS