Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणाचा दणका; मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर रूपाली चाकणकर यांचा राजीनामा

https://youtu.be/vNLs2AVX9Ss?si=iXL-_sKwoQeUEdfI नाशिकमधील बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या 'भोंदूबाबा' अशोक खरात याच्याशी जवळीक

इराण संघर्षामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने : पंतप्रधान मोदी
रुपयाची ऐतिहासिक नीचांकी घसरणऊर्जा संकट गडद, परकीय भांडवलांच्या माघारीमुळे रुपया 93.24 वर
अटकेपूर्वी खरात सनदी अधिकार्‍यांना भेटला; शिर्डीत भेट घेतलेले ते तीन अधिकारी कोण ?

नाशिकमधील बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ‘भोंदूबाबा’ अशोक खरात याच्याशी जवळीक असल्याचा आरोप झाल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शुक्रवारी (२० मार्च २०२६) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
अशोक खरात याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होत होती. मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावून तातडीने राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली असून राजीनामा पत्रात वैयक्तिक कारणे दिल्याचे वृत्त आहे.
रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष असून, त्यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती.

COMMENTS