Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ड्रोन तंत्रज्ञानात आत्मनिर्भरता हीच भारताची खरी ताकद; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : बदलत्या जागतिक परिस्थितीत युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, पारंपरिक शस्त्रांपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साधनांची भूमिका अ

नऊ वर्षानंतर इस्रो मंगळयान-2 च्या तयारीत
रोहित्र बंद विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; घेराव नंतर वीज कनेक्शन सुरू
टाटा हॅरियर ही कार देखील इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये लाँच करू शकते.

नवी दिल्ली : बदलत्या जागतिक परिस्थितीत युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, पारंपरिक शस्त्रांपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साधनांची भूमिका अधिक प्रभावी ठरत आहे. विशेषतः ड्रोन आणि त्याविरोधातील तंत्रज्ञान हे भविष्यातील संघर्षांमध्ये निर्णायक ठरणार असल्याचे मत संरक्षण मंत्री ठरक्षपरींह डळपसह यांनी व्यक्त केले.

दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय संरक्षण उद्योग परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, रशिया-युक्रेन तसेच इराण-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांनी युद्धाच्या नव्या पद्धती जगासमोर आणल्या आहेत. या संघर्षांमध्ये ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अँटी-ड्रोन तंत्रज्ञान तितकेच महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे भारताने या क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी संरक्षण क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिफेन्स इंडिया स्टार्ट-अप चॅलेंज’च्या नव्या आवृत्तीचा शुभारंभ केला. या उपक्रमांतर्गत यंदा शंभरहून अधिक आव्हाने मांडण्यात आली असून, संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी लघु आणि मध्यम उद्योग, नवउद्योजक आणि संशोधक यांना प्रोत्साहन देणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. मोठ्या उद्योगांसोबत छोटे उद्योग जोडले गेले तरच देशात संशोधन, नवकल्पना आणि तंत्रज्ञान विकासाला गती मिळेल, असे ते म्हणाले. सरकारच्या स्पष्ट धोरणांमुळे संरक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल होत असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करताना देशाने स्वदेशी तंत्रज्ञानावर अधिक भर द्यायला हवा. ड्रोन निर्मिती आणि त्यास पूरक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी राहिल्यास भारताची संरक्षण क्षमता अधिक मजबूत होईल.

COMMENTS