Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावमधील ४८ कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार; आ. काळे यांच्या पाठपुराव्यातून मिळाले यश

कोपरगाव :  नगरपालिका हद्दीतील स्वतःच्या हक्काचे घर नसणाऱ्या आणि कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी आ. आशुतोष काळे

समाजाच्या उत्कर्षासाठी स्व.शंकरराव कोल्हेंचे योगदान : ह.भ.प. शेवाळे
आ. काळेंकडून अवैध वाळू उपशाचा प्रश्न विधिमंडळात
जामखेडमध्ये गोळीबारात जखमी झालेल्या पैलवान सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू

कोपरगाव :  नगरपालिका हद्दीतील स्वतःच्या हक्काचे घर नसणाऱ्या आणि कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून शहरातील ४८ पात्र लाभार्थ्याच्या घरकुलांना मंजुरी मिळाली असून या लाभार्थ्यांना सोमवार (दि.१६) रोजी मंजुरी पत्रांचे आदेश अधिकृतपणे वितरीत करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हजीमेहमूद सय्यद यांनी दिली आहे.

 कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासा बरोबरच सामान्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर आ. आशुतोष काळे यांचा नेहमीच भर राहिला आहे. मागील वर्षी या योजनेसाठी विशेष प्रयत्न करून या प्रयत्नांमुळेच कोपरगाव शहरातील ३१० पात्र कुटुंबांना यापूर्वीच हक्काची घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही परंपरा पुढे सुरू ठेवत याहीवर्षी पुन्हा ४८ कुटुंबांसाठी घरकुल मंजूर करून आणण्यात त्यांना यश मिळाले आहे. फक्त घरकुले मंजूर करून आ. आशुतोष काळे थांबले नाही तर घरकुल अनुदान आणि अनुदान हप्ते वेळेवर मिळावे यासाठीसुद्धा ते प्रयत्न करीत असतात त्यामुळे शहरातील गरीब व गरजू कुटुंबांमध्ये हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.

 कोपरगाव नगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या आणि घरकुल योजनेच्या अटींची पूर्तता करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आ. आशुतोष काळे यांचा प्रयत्न आहे. ज्या कुटुंबांकडे स्वतःची जागा आहे परंतु आर्थिक परिस्थिती अभावी पक्के घर बांधणे शक्य नाही अशा नागरिकांना आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र आणि राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेतून घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पाठपुरावा करीत राहणार असल्याचे नगरसेवक हजीमेहमूद सय्यद यांनी सांगितले आहे.

COMMENTS