Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तृतीयपंथीयांकडून यल्लमादेवीचा भक्तिमय जागर; जगातील युद्धसंकट दूर करण्यासाठी देवीचरणी प्रार्थना

अहिल्यानगर : शहरात तृतीयपंथी समाजाच्या वतीने श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाने भरलेला यल्लमादेवीचा जागर उत्साहात आयोजित करण्यात आला. जगभरात सुरू असलेल्या युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर भारतावर कोणतेही संकट येऊ नये, यासाठी देवीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.  १३ मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमात बिपाशा गुरु नगरकर यांच्या उपस्थितीत तृतीयपंथी समाजातील सदस्यांसह आराधी–जोगती यांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला. यावेळी देवीसमोर ५६ प्रकारचे नैवेद्य अर्पण करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर करत यल्लमादेवीचा उजळणी जागर करण्यात आला. ढोल-ताशांच्या तालावर आणि पारंपरिक गजरात सादर झालेल्या या जागरामुळे परिसर भक्तिमय झाला होता. कार्यक्रमादरम्यान सध्याच्या जागतिक परिस्थितीवरही चर्चा करण्यात आली. इस्रायल आणि इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभर अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा परिणाम भारतावर होऊ नये, यासाठी देवीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. तसेच हिंदू धर्म टिकवणे, संस्कृती जपणे आणि गुरु–शिष्य परंपरा कायम राखण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. समाजात अनेकदा उपेक्षित मानल्या जाणाऱ्या तृतीयपंथीयांनी या कार्यक्रमातून समाजहित, राष्ट्रप्रेम आणि संस्कृतीप्रती असलेली आपली निष्ठा व्यक्त केली.  या वेळी गादीपती पिंकू गुरु, कुलगुरू किरण नेटके गुरु, अक्कू गुरु नगरकर, सानप नगरकर गुरु, लैला गुरु, अमृता गुरु, आकाश गुरु, शिवन्या गौरी, छकुली गुरु, तेजश्री गुरु, ओम गुरु, सनी गुरु यांच्यासह तृतीयपंथी समाजातील अनेक जण उपस्थित होते.

माहिती अधिकाराच्या माहितीप्रकरणी आंदोलनाचा इशारा
ॲसिड हल्ल्यातील चिमुकलीला न्याय द्या; संगमनेरमध्ये भव्य रस्ता रोको ; कठोर शिक्षेची मागणी
ढवळपुरी येथे आरोपी थोरातचा पुतळा जाळला

अहिल्यानगर : शहरात तृतीयपंथी समाजाच्या वतीने श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाने भरलेला यल्लमादेवीचा जागर उत्साहात आयोजित करण्यात आला. जगभरात सुरू असलेल्या युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर भारतावर कोणतेही संकट येऊ नये, यासाठी देवीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

 १३ मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमात बिपाशा गुरु नगरकर यांच्या उपस्थितीत तृतीयपंथी समाजातील सदस्यांसह आराधी–जोगती यांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला. यावेळी देवीसमोर ५६ प्रकारचे नैवेद्य अर्पण करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर करत यल्लमादेवीचा उजळणी जागर करण्यात आला. ढोल-ताशांच्या तालावर आणि पारंपरिक गजरात सादर झालेल्या या जागरामुळे परिसर भक्तिमय झाला होता.

कार्यक्रमादरम्यान सध्याच्या जागतिक परिस्थितीवरही चर्चा करण्यात आली. इस्रायल आणि इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभर अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा परिणाम भारतावर होऊ नये, यासाठी देवीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. तसेच हिंदू धर्म टिकवणे, संस्कृती जपणे आणि गुरु–शिष्य परंपरा कायम राखण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. समाजात अनेकदा उपेक्षित मानल्या जाणाऱ्या तृतीयपंथीयांनी या कार्यक्रमातून समाजहित, राष्ट्रप्रेम आणि संस्कृतीप्रती असलेली आपली निष्ठा व्यक्त केली.

 या वेळी गादीपती पिंकू गुरु, कुलगुरू किरण नेटके गुरु, अक्कू गुरु नगरकर, सानप नगरकर गुरु, लैला गुरु, अमृता गुरु, आकाश गुरु, शिवन्या गौरी, छकुली गुरु, तेजश्री गुरु, ओम गुरु, सनी गुरु यांच्यासह तृतीयपंथी समाजातील अनेक जण उपस्थित होते.

COMMENTS